शिरुर (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या अचूक वेळेचा अंदाज शिरुरकरांना अनुभवायला मिळाला. शिरुर नगर परिषदेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची असताना अजित पवारांनी बरोबर 6.59 ला फीत कापली…!
शिरुर नगर परिषदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची ठरलेली होती. पण अजित पवारांचं 6. 50 वाजताच कार्यक्रमस्थळी आगमन झालं. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने अजित पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
उद्घाटन वेळेआधीच अजित पवारांनी फीत कापून इमारतीचं औपचारिक उद्घाटन केलं. कार्यक्रमाला शिरुरचे खासदार अमोल कोल्हे, शिरुरचे आमदार अशोक पवार, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर अजित पवार यांनी शिरुर नगरपालिका इमारतीची अगदी बारकाईने पाहणी केली. बांधकाम कसं झालं आहे, कोणत्या त्रुटी तर नाहीत ना?, याची व्यवस्थित पाहणी केली. अजित पवारांच्या परीक्षेत नगरपालिका इमारतीचे कंत्राटदार आणि सत्ताधारी पास झाले. यावेळी अजित पवारांनी बांधकामाविषयी कोणतीही तक्रार न केल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं.
अजित पवार यांनी इमारतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी नगरपरिषदेच्या हद्दीचा नकाशा पाहिला. यावेळी त्यांनी संबंधितांना योग्य त्या सूचनाही केल्या. नगरपालिकेमधील नगरसेवकांशी संवाध साधल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
शिरुर नगरपरिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांनी माणिकचंद ग्रुपचे संचालक नगरपरिषदचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांना टोमणा मारला. तुमच्यामुळे शिरुरमधील जमिनीच्या किमती वाढल्या, असं ते म्हणाले.
शिरूर तालुक्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 100 कोटी पेक्षा जास्त निधी दिलाय. शिरूर मध्ये 7200 कोटींचा उड्डाणपूल तयार करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शिरूर मध्ये प्रचार करण्यासाठी येत असतात. त्यावेळी निवडणूक काळात प्रकाश धारिवाल यांना दम देत होते, तुम्ही उद्योजक आहेत, असं करु, तसं करु मात्र या सगळ्यांना प्रकाश धारिवाल घाबरले नाही, असं शिरुरचे आमदार अशोक पवार म्हणाले.
(DCM Ajit Pawar inaugurated ahead of time Maharashtra Shirur nagarpalika Building)
हे ही वाचा :