आधी समोस्यामध्ये कंडोम, आता बर्फाच्या लादीत उंदीर…पुण्यात चालले तरी काय?, व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Apr 11, 2024 | 7:35 AM

Pune News: खाद्यपदार्थांची शुद्धता तपासण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर आहे. परंतु बर्फ बनवणाऱ्या कंपन्यांकडे या विभागाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे सध्या दिसून येत आहे. ठिकठिकाणी कोणतेही पाणी वापरून बर्फ तयार केले जात असताना अधिकारी गप्प बसले आहे.

आधी समोस्यामध्ये कंडोम, आता बर्फाच्या लादीत उंदीर...पुण्यात चालले तरी काय?, व्हिडिओ व्हायरल
बर्फाच्या लादीत मिळाला मृत उंदीर
Follow us on

उन्हाळा सुरु झाला आहे. आता सर्वांना गारवा हवा आहे. शीतपेयांची मागणी वाढली आहे. शेतीपेयांमध्ये टाकण्यासाठी बर्फ वापरला जातो. परंतु पुणे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर सापडला आहे. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी ऑटोमोबाईल कंपनीच्या कँटीनमध्ये कंडोम, तंबाखू, गुटखा, दगड कोंबलेले समोसे मिळाले होते. त्यानंतर आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर मिळाला आहे. यामुळे पुणे शहरात चालले तरी काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग शांत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई अजून होत नाही.

कुठे घडली घटना

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे हा प्रकार घडला आहे. बर्फाची लादी विक्री करत असताना एका बर्फाच्या लादीत चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे. यामुळे बर्फाचा वापर वाढला आहे. या बर्फातून अनेक ठिकाणी सरबत बनवले जाते. बर्फाचा गोळा ठिकठिकाणी विकला जात आहे. ऊसचा रस बर्फ टाकून दिला जातो. शीतपेयांमध्ये बर्फ टाकला जातो. यामुळे बर्फाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु बर्फ बनवताना काही उत्पादक काहीच लक्ष देत नाही. कोणत्या पाण्याचा वापर करत आहेत, हे मेलेले उंदीर मिळाल्यानंतर समोर आले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यात समोस्यामध्ये आढळले होते कंडोम

पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमध्ये समोस्यामध्ये कंडोम, गुटख्याचा पुढ्या मागील आठवड्यात सापडल्या होत्या. एका ऑटोमोबाईल कंपनीच्या कँटीनमध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली होती. कंपनीने एका कंत्राटदारांचे कंत्राट रद्द केल्याच्या रागातून हा प्रकार केला होता. ठेकेदाराला बदनाम करण्याच्या हेतूने हा प्रकार केला होता. या प्रकारानंतर आता बर्फाच्या लादीत उंदीर मिळाला आहे.

खाद्यपदार्थांची शुद्धता तपासण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर आहे. परंतु बर्फ बनवणाऱ्या कंपन्यांकडे या विभागाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे सध्या दिसून येत आहे. ठिकठिकाणी कोणतेही पाणी वापरून बर्फ तयार केले जात असताना अधिकारी गप्प बसले आहे.