पुणे : बैलाचं आणि शेतकऱ्याचं नातं काही औरचं. या नात्याला बरेच शेतकरी (farmer) जपतात. बैलांच्या भरोशावर शेतकरी शेती करतो. पण, तो बैल (bull) जातो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. मग, त्या बैलाच्या कष्टाची परतफेड कशी करणार असा प्रश्न त्याच्यापुढं निर्माण होतो. अशावेळी तो काहीतरी वेगळं करून जातो. अशीच घटना कर्नावड येथे घडली. कर्नावडच्या गणेश मरगजे या शेतकऱ्याने कैलास नावाच्या लाडक्या बैलाचा माणसांप्रमाणे तेरावा विधी केला. 20 वर्षे मुलाप्रमाणे संभाळलेल्या कैलास बैलाचा वृद्धापकाळाने 28 फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. विधिवत पूजा करून, तेराव्याला संपूर्ण गावाला जेवण दिलं. तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते.
पुण्यातल्या भोरमधील कर्नावड गावातली ही गोष्ट. गणेश मरगजे या शेतकऱ्याच्या कैलास नावाच्या बैलाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. या बैलाच्या कष्टाची परतफेड कशी करायची असा प्रश्न त्याच्यापुढं निर्माण झाला. आपल्या लाडक्या कैलास नावाच्या बैलाचा मानवी प्रथेप्रमाणे तेरावा विधी केलाय. 2002 मध्ये हा बैल विकत घेतला होता. मुलाप्रमाणे जीव लावलेल्या कैलास बैलासोबत त्यांनी वीस वर्षे आपला शेती व्यवसाय चालवला.
कैलास नावाच्या बैलासोबत २० वर्षे शेती केली. 28 फेब्रुवारीला वृद्धापकाळाने कैलासचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी कुटुंबातला सदस्य गेला या भावनेने कैलासचा तेरावा विधी करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी विधिवत पूजा करून संपूर्ण गावाला तेराव्याचं जेवण घालण्यात आलं. या तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होता. परिसरात सध्या शेतकरी गणेश मरगजे आणि त्यांच्या बैलाच्या प्रेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
कैलास गेल्यानंतर गणेश मरगजे खचून गेले. पण, मृत्यू अटळ आहे, याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्या बैलाचा तेरावा विधी करण्याचं ठरवलं. घरच्यांनी होकार दिला. पंचक्रोशीतील लोकंही आले. गणेशच्या कृतज्ञता भावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे हा शेतकरी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.