पुणे | 28 सप्टेंबर 2023 : पुणे शहराकडे येणारे विमान दिल्ली विमानतळावर रन वेवर तयार झाले होते. प्रवाशी विमानात जाऊन बसले होते. त्यात लहान मुले आणि वृद्धही होते. परंतु विमान काही टेकऑफ घेत नव्हते. बराच वेळ ताटकळत बसल्यावर प्रवाशांमध्ये कुजबुज सुरु झाली. यावेळी विचारणा सुरु झाली. परंतु उत्तर मिळत नव्हते. यामुळे लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी कंपनीच्या कर्मचार्यांनी विलंबाचे कारण सांगितले. ऑपरेशनलमधील समस्येमुळे विमान टेकऑफ घेत नसल्याचे सांगितले.
एअर इंडियाचे विमान 26 सप्टेंबर रोजी दिल्लीवरुन पुणे शहराकडे येणार होते. विमान क्रमांक AI853 धावपट्टीवर तयार होते. प्रवाशाही विमानात बसले होते. विमान कंपनी पायलटची वाट पाहत होती. तब्बल चार तास विमान उभे होते. या फ्लाइटमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते. त्यांना हे विमान का थांबले आहे? याची काहीच माहिती मिळत नव्हती.
आपली कामाची वेळ संपल्यामुळे पायलट विमानातून निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिले. 26 सप्टेंबर रोजी विमानाचा दुसरा पायलट रात्री 10.30 वाजता आला. त्यानंतर 11:15 वाजता विमानाने पुणे शहराकडे उड्डन घेतले. विमानास विलंब होत असताना अनेकांनी व्हॉट्सॲपद्वारे विमान कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी 25 सप्टेंबर दिल्ली-पुणे विमान उशिराने निघाले. सलग दुसऱ्या दिवशी उशीर झाला. 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.10 वाजता निघणारे विमान रात्री 9 वाजता दिल्लीहून निघाले होते. त्यानंतर ते पुणे शहरात रात्री 11 वाजता आले.
विमानास उशीर होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये कुजबुज सुरु होती. यासंदर्भातील आपले अनुभव काही प्रवाशांनी सोशल मीडियावर टाकले आहे. एक्सवर लिहिताना एका युजरने म्हटले की, आमच्या विमानाचे अपहरण झाल्यासारखे आम्हाला वाटत होते. श्वास कोंडून ठेवणारे ते वातावरण होते. यापूर्वी पायलट न आल्यामुळे 5 जुलै रोजी दिल्लीवरुन कोलकात्याला जाणारे इंडिगोचे विमान एक तास उशिराने उड्डाण केले होते.