‘त्या’ प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना विचारूनच निर्णय घेतो

| Updated on: Aug 08, 2021 | 6:01 PM

कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देतानाच, ज्या दिवशी 7 टक्केच्या पुढे पॉझिटिव्ह रेट जाईल त्या दिवशी पुन्हा निर्बंध लागू होतील, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना विचारूनच निर्णय घेतो
AJIT PAWAR
Follow us on

पुणे : पुण्यातील निर्बंधांवरुन स्थानिक व्यापाऱ्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या भूमिकेबाबत आज स्पष्टीकरण दिले. “पुण्याच्याबाबत काहीही ठरवताना मी मुख्यमंत्र्यांना विचारूनच निर्णय घेत असतो. त्यावर बाकीच्यांनी कुणी विचारलं तर सरळ सांगावं तिथले पालकमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतील”, असे अजित पवार म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी हे विधान केले. पुण्याबाबत पालिकेने प्रस्ताव पाठवावा किंवा आम्हाला विचारावं असं सांगितलं जातं? असा सवाल पत्रकारांनी यावेळी केला होता. (Deputy chief minister Ajit Pawar said, I take decision only after asking the Chief Minister)

पहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा हा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. पुणे जिल्हा भौगोलिक दृष्ट्या विखुरलेला आहे. सर्व बाबी माझ्या कानावर आल्या तेव्हा इथे आपल्याला थोडी वेगळी भूमिका घ्यावी लागेल असे मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं. मग मुख्यमंत्री कलेक्टर, पालिका आयुक्त, सीपींशी बोलले, माझ्याशी दोन-तीन वेळा बोलले. या जिल्ह्याची लोकसंख्या मोठी आहे. आजही ग्रामीणला तिसऱ्या स्तरावर ठेवलेय. कारण उद्या तिथे प्रमाण वाढलं तर पुन्हा सगळीच परिस्थिती बदलून जाते. कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देतानाच, ज्या दिवशी 7 टक्केच्या पुढे पॉझिटिव्ह रेट जाईल त्या दिवशी पुन्हा निर्बंध लागू होतील, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

पुण्यात उद्यापासून अनलॉक होत आहे. कोरोनाच्या निर्बंधामध्ये शिथिलता देत पुण्यात अनलॉकची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयोजित कोरोना आढावा बैठकीत केली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांना कोरोना निर्बंधांमध्ये दिलेली शिथिलता आणि मुंबई-ठाण्यात व्यापारी वर्गाला देण्यात आलेला दिलासा पाहता पुण्यातील व्यापारी वर्ग आक्रमक झाला होता. पुण्यात दुजाभाव करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात होता. याबाबतही अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे.

पुण्यात निर्बंधांमध्ये शिथिलता

पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असल्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी करण्यात येत होती. व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत होतं. आज अखेर राज्य सरकारकडून पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार आता पुण्यात

> सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
>> हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
>> शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
>> मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश (Deputy chief minister Ajit Pawar said, I take decision only after asking the Chief Minister)

संबंधित बातम्या

मंदिरं, धार्मिक स्थळं बंदच राहणार, गणेशोत्सवाचं काय होणार? अजित पवारांचं थेट उत्तर

Pune unlock: पुणे शहर अनलॉक होतंय, पण ग्रामीणचं काय होणार?; अजित पवारांनी सांगितलं काय सुरू, काय बंद?