इंदापूर – दिवाळी सणानिमित्त कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढल्या. त्यामुळे धावपळ झाल्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना थकवा जाणवत होता. थकवा जाणवत असल्याने त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावत, घरीच आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र तरी देखील भरणे हे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या प्रेमापोटी विविध कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या शुभ मुहूर्तावर त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. तीन दिवस सारखी धावपळ झाल्याने भरणे हे आजारी पडले होते. त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली, उपचारानंतर डॉक्टरांनी घरीच आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरी देखील भरणे यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे.
भरणे हे सध्या इंदापूर दौऱ्यावर आहेत. ते सततच्या धावपळीमुळे आजारी पडले होते. त्यांना सलाई लावण्यात आले. मात्र भरणे हे तालुक्यात आहे असे समजताच कार्यकर्त्यांनी त्यांना विविध कामांच्या उद्घाटनासाठी बोलावले, कार्यकर्त्याचा हिरोमोड होऊ नये म्हणून आजारी असताना देखील भरणे यांनी तालुक्यातील आनेक ठिकाणी जाऊन, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. भरणे यांच्या या कृतीने त्यांचे कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
संबंधित बातम्या
पिंपरी- चिंचवडमध्ये गुंडांचा उच्छाद ; गोंधळ घालत केली वाहनांची तोडफोड
राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; ५२ लाखांच्या विदेशी मद्यासह एकाला अटक