मुंबई : पाच राज्यातील निवडणूक निकालात (Five State Election result 2022) मोठं यश मिळाल्यानंतर भाजप नेते सतत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) डिवचत आहेत. फडणवीसही गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त कॉन्फिडंट झाले आहेत. आज देवेंद्र फडणवीस मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीला गेले होते. त्यांनी या शर्यतीत धावणाऱ्या बैलगाड्यांच्या नंबरचा आधार घेत पुन्हा महाविकास आघाडीविरोधात जोरदार टोलेबाजी केलीय. मी ठरवलं की नंबर 1 येतोच, मात्र महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट जूळवून पहिले आले, असा खोचक टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी फडणवीसांनी आत्तापासूनच सुरू केलीय. गेल्या विधानसभा निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेतून बाहेर आहे. मात्र तीन पक्षांनी एकत्र येत बहुमत जुळवल्यामुळे फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं आहे.
भाजप नेत्यांचा जोश हाई
आता गोव्या, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमधल्या विजयाने भाजप नेत्यांचा जोश सध्या हाई आहे. त्यामुळे निवडणूक निकला लागल्यापासून भाजप नेते रोज महाविकास आघाडीला डिवचत आहे. गेल्या अडीच वर्षात भाजपकडून सरकार पडण्याच्या अनेक तारखा देण्यात आल्या. मात्र भाजपचे सर्व मुहूर्त आतापर्यंत तरी फेल ठरले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आता डायरेक्ट 2024 च्या विधानसभा निवडणुकीवर फोकस केलाय. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील अंतर्गत खदखदही अनेकदा बाहेर आलीय. त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत भाजला होईल, अशाही राजकीय चर्चा रंगत आहेत. आतापासून तयार होणारे राजकीय वातावरण पाहता येणारी निवडणूक रंगत होणार एवढं मात्र नक्की झालंय.
बैलगाडा शर्यतीबद्दल काय म्हणाले?
फडणवीसांनी यावेळी सर्वांचे आभार मानले, त्यानंतर शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांचे देखील आभार मानले. बैलगाडा शर्यती वर बंदी आण्याऱ्यांनी मावळात येऊन पाहावे. आपलं सरकार आलं आणि आम्ही प्रयत्न करत बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र ही मंडळी पुन्हा कोर्ट मध्ये गेली आणि बंदी आणली. मी त्यावेळी एक समिती निर्माण केली आणि बैल हा धावणारा प्राणी आहे म्हणून कागदपत्रे कोर्टमध्ये देत ही बंदी उठवली, असा दावाही यावेळी फडणवीसांनी केला आहे. तसेच मला आज आनंद आहे, माझा बैलगाडा इथं धावला, पहिला नंबर ही आला. 2014 आणि 2019ला देखील जनतेने आम्हाला पहिलं आणलं, पण काहींनी शाळा केली. मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला, तो कधी मागे हटत नाही, असे म्हणत त्यांनी बोलता बोलता महाविकास आघाडीला आव्हान दिलंय.
Raut on MIM: खरी जनाब सेना कोण, हे महाराष्ट्राला सांगणार; भाजपचा कट उधळला, राऊतांचा घणाघात
Darekar On Raut: खोतकरांची हाताची घडी, सत्तार हिंदुत्वाची भूमिका मांडतात, दरेकरांचं सूचक वक्तव्य
MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते ? मनसे नेते देशपांडेच्या सवालानं शिवसेनेची कोंडी