पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आलं. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं हे महामंडळ सुरु होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला. त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यानाही हे महामंडळ निर्माण करता आलं नाही, असं धनंजय मुंडे म्हणत पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे.
माझ्या जीवनातला आजचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. माझा जन्म ऊसतोड मजुराच्या पोटी झालाय. माझा जीवनातला हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता हे प्रामाणिकपणे सांगतो.मागच्या सरकारच्या काळात मंडळ आलं गेलं. नाव जरी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं आहे तरी त्यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महामंडळ देणं शक्य झालं नाही. त्यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यांनाही हे महामंडळ निर्माण करता आले नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी, असं धनंजय मुंडे म्हणाले.आजचा कार्यक्रम हा मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे.
#थेटप्रक्षेपण
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा लोकार्पण सोहळा
https://t.co/OoELaNXR6e— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 3, 2022
ऊसतोड भगिनी आहेत, त्यांचा प्रश्न आहे. चार दिवस कमी होतात म्हणून आमच्या भगिनीच गर्भायश काढावा लागत असेल तर काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय, अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. आमच्या भगिनींच्या आरोग्याची काळजीही महामंडळ घेईल. भगवान गड असेल किंवा बीड जिल्ह्यातील इतर गड असतील हे कोणत्याही मोठ्या माणसांच्या देणगीवर नाही तर ऊसतोड मजुरांच्या देणगीवर मोठे होतायेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रात ऊस कारखाने हे ऊसतोड कामगारांच्या जीवावर चालतात, असं म्हटलंय. अनेक कष्ट हे ऊसतोड कामगार घेतात, त्यांच्या घामावरच ही अर्थव्यवस्था चालते हे विसरुन चालणार नाही, असं थोरात म्हणाले. साखर कारखाना असला तरी तुमच्याबद्दल आपुलकी ठेवणारे आम्ही आहोत. गोपीनाथ मुंडे हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री ठेवणारं व्यक्तिमत्व होतं, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.
Akola: जेव्हा मोठ्या बहिणीला छोटेपणीच आई व्हावं लागतं! का? आईला परीक्षा देता यावी म्हणून…