पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : जागतिक क्रिकेट करंडक स्पर्धेचा थरार सुरु झाला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पुणे शहरात तब्बल 27 वर्षांनी क्रिकेटचे सामने होत आहे. यामुळे हे सामने पाहण्यासाठी अनेक पुणेकरांनी आणि क्रिकेटप्रेमींनी तयार केली आहे. पुण्यात 19, 30 ऑक्टोबर, 1, 8 आणि 11 नोव्हेंबर रोजी सामने होणार आहे. या सामन्याच्या तिकिटांसाठी बुकींग सुरु झाली आहे. परंतु अनेकांना तिकीट मिळत नाही. सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. पहिले दोन सामने भारताने जिंकले आहे. आता भारताचा तिसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताचे सामने पाहण्यासाठी नाही मिळाले तरी आपल्या शहरात किंवा परिसरात होणारा सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी तयारी केली आहे. क्रिकेटप्रेमी ऑनलाईन तिकीट बुकींग करत आहेत. पुणे येथील गहुंजे स्टेडियमवरही होणाऱ्या पाच सामन्यांसाठी तिकिटींची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे.
१९, ३० ऑक्टोबर, १, ८ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्याचे तिकीट बुकींग सुरु झाले आहे. परंतु तिकीट बुक करताना अडचणी येत आहेत. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. तसेच काही जणांना एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली.
पुण्यात होणाऱ्या #ICC_World_Cup क्रिकेट सामन्यांच्या तिकिटासंदर्भात अनेकजण विचारणा करतायेत. ऑनलाईन तिकिट मिळताना काही अडचणी येत आहेत, हे खरं आहे, मात्र तिकीट विक्री ही #MCA च्या अखत्यारीत येत नाही तर सर्व नियंत्रण हे #ICC कडं आहे. त्यामुळं तिकीटासंदर्भात तुम्हाला येणाऱ्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 12, 2023
रोहित पवार यांनी तक्रारीची दाखल घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यावर म्हटले आहे की, तिकिटांचे बुकींग हा विषय आयसीसीच्या अखत्यारीत आहे. त्यामध्ये एमसीएचा काहीही संबंध नाही. परंतु मी संबंधित विषयात लक्ष घातले आहे. यासंदर्भातील मेसेज योग्य ठिकाणी पाठवला आहे. रोहित पवार यांच्या टि्वटरला अनेकांनी उत्तर देत आयसीसीच्या कारभारवर प्रश्न उपस्थित केले आहे.
गहुंजे स्टेडियमवरील सामने पाहण्यासाठी पुणेकरांसाठी बसची सोय केली आहे. पुणे मनपा भवन येथून सकाळी ११, ११.३५, १२.०५ यावेळेत बस सुटणार आहेत. तसेच कात्रजवरुन सकाळी ११ आणि ११.३० वाजता बस सुटणार आहे. निगडीवरुन दुपारी १२ आणि साडेबारा वाजता बस सोडण्यात येणार आहे. डे-नाईट सामन्यासाठी या तिघ ठिकाणांवरुन बस सोडण्यात येणार आहे.