वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, वारी चार दिवसांवर आली असताना इंद्रायणीत सोडले केमिकलचे पाणी

| Updated on: Jun 07, 2023 | 3:08 PM

indrayani river pollution : इंद्रायणी नदीतील प्रदूषणाचा मुद्दा अधूनमधून चर्चेला येत असतो. नदीमध्ये केमिकलचे पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे होत असतात. आता वारी चार दिवसांवर आली असताना नदीत प्रदूषणयुक्त पाणी सोडले गेले आहे.

वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, वारी चार दिवसांवर आली असताना इंद्रायणीत सोडले केमिकलचे पाणी
indrayani river pollution (File Photo)
Follow us on

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून इंद्रायणी नदीत रसायनयुक्त सोडणाऱ्यांवर अधूनमधून कारवाई केली जाते. काही महिन्यांपूर्वी मनपाने सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्यांवर गुन्हा दाखल केला होता. परंतु उद्योजकांकडून नदीत केमिकल युक्त पाणी सोडणे काही बंद होत नाही. आता वारीत येणारे वारकरी या नदीत आंघोळ करतात. आता आषाढी वारीला सुरुवात होत आहे. वारी चार दिवसांवर आली आहे. त्यानंतरही नदीत केमिकल युक्त पाणी सोडले गेले आहे. यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वारी येणार ११ तारखेला

इंद्रायणी नदी पुन्हा एकदा केमिकलच्या पाण्यामुळे फेसाळली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी चार दिवसांवर आली असताना वारीतील वारकऱ्यांचा आरोग्य धोक्यात आणण्याचा हा प्रकार सुरु आहे. चार दिवसांवर वारी आली असताना केमिकल सोडल्याने इंद्रायणी नदीचे पात्र पुन्हा एकदा फेसाळ्याचे पाहायला मिळत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 11 जूनला होत आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याचं कुणाला काही पडलच नाही, अशी स्थिती आळंदीतल्या इंद्रायणी नदीकडे पाहून होत आहे. यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचं इंद्रायणी नदीत स्नान केल्याने आरोग्य धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनातर्फे महाआरोग्य शिबीर

यंदाच्या आषाढी यात्रेत राज्य शासनाचे वतीने महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 28 आणि 29 जून असे दोन दिवस महाआरोग्य शिबीर होणार आहे. 29 जूनला आषाढी यात्रेचा सोहळा आहे, त्या पार्श्वभूमीवर हे शिबीर होणार आहे. शिबिरात २० लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी संकल्पनेवर आरोग्य विभागाचे शिबीर होणार आहे. वाखरी, गोपाळपूर, सोलापूर रोड अशा तीन ठिकाणी महाआरोग्य शिबीर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

काय झाले होते

इंद्रायणी नदीवर अनेकवेळा बर्फाची चादर दिसते. एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे बर्फाची चादर दिसते तशीच अवस्था इंद्रायणी नदीची झाली होती. नदी पात्रात अनेक ठिकाणी फेसच-फेस दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था होत असते. परंतु त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आळंदीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यांपूर्वी आले होते. त्यावेळी महेश महाराज मडके यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा मांडला होता. तेव्हा मुख्यमंत्री यांनी नदी स्वच्छतेचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर काहीच झालेले नाही.