Ashadhi Wari 2023 : ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज पालख्यांचे पुण्यात आगमन, वाहतूक मार्गात बदल

| Updated on: Jun 13, 2023 | 3:55 PM

Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशी आली की वारेकऱ्यांची पावले पंढरीच्या वाटेवर वळतात. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांची पालखीचा महत्वाचा टप्पा आज पुण्यात होणार आहे. या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहे.

Ashadhi Wari 2023 : ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज पालख्यांचे पुण्यात आगमन, वाहतूक मार्गात बदल
palkhi
Follow us on

रणजित जाधव, पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज अन् ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामला राहणार आहे. पालखीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज आपल्या तिसऱ्या मुक्काम स्थळी म्हणजे पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. तुकोबांची पालखी रविवारी संध्याकाळी उद्योग नगरी म्हणजेच पिंपरी चिंचवडृमध्ये दाखल झाली, तेव्हा लाखो वारकरी अन् भाविकांचे पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीच पिंपरीमधील वल्लभनगरमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

आज पुण्यात मुक्काम

ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम पुणे भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिर, तर संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिरात नाना पेठ येथे असणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी मंदिरांमध्ये पालखीचे आगमन झाल्यावर अभिषेक, पादुका पूजन आणि आरतीने पालख्यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रात्रभर भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रशासनाची तयारी पूर्ण

दरम्यान पालखी येण्यापूर्वी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यात वारेकऱ्यांच्या व्यवस्थेपासून सुरक्षेपर्यंत सर्व काळजी घेतली आहे. पुण्यात पालखी मुक्कामी असणाऱ्या दोन्ही मंदिराची बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आला आहे. लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखीला दिला आहे. पालखीचे लोकेशन diversion.punepolice.gov.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. तसेच पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी पोलिसांनी केली आहे.

वाहतुकीस बंद असणारे मार्ग (कंसात पर्यायी मार्ग)

  • गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता
  • फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स
  • शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता
  • टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल
  • लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता