पुणे | 2 सप्टेंबर 2023 : पुणे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. पुणे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक किल्ले आहेत. पेशवे यांचे निवासस्थानही पुणे शहरात होते. अनेक धार्मिक स्थळे पुणे शहरात आहेत. राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. यामुळेच तर पुणे तेथे काय उणे, असे म्हटले जाते. यामुळे पुणे शहरात भटकंती करण्यासाठी जात असाल तर ही पाच स्थळे पाहणे विसरु नका.
सह्याद्री पर्वताच्या रांगेत सिंहगड किल्ला आहे. सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. पुणे शहरापासून फक्त २५ किलोमोटर अंतरावर हा किल्ला आहे. शिवाजी महाराज यांच्यासाठी हा किल्ला महत्वाचा होता. या किल्ल्यावरुन परिसरावर लक्ष ठेवण्यात येत होते. पुणे शहरातील सारस बागजवळ पर्वती हिल्स आहे. दोन हजार फूट उंचीवर असलेल्या या जागेवर बाजीराव पेशव यांनी भगवान शंकर आणि पार्वती यांचे मंदिर बांधले होते.
पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शनिवार वाडा आहे. हा किल्ला बाजीराव पेशवे यांनी बांधला होता. 625 एकर क्षेत्रात हा किल्ला पसरला आहे. 1828 मध्ये हा किल्ला जाळून टाकला होता. त्यानंतर आता काही अवशेष या किल्ल्यांचे राहिले आहे. शनिवार वाड्याल ऐतिहासिक स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
पुण्यातील आगाखान पॅलेस 1892 मध्ये सुलतान आगा खान यांनी तयार केला होता. इंग्रजांच्या राजवटीत या ठिकाणी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई, सरोजनी नायडू यांना कैदेत ठेवले होते. या पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचा मृत्यू झाला होता. आता या ठिकाणी संग्रहालय आहे.
पुणे शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे. मंदिरात गणरायाच्या मूर्तीवर 40 किलो सोन्याचे दागिने आहेत. या मंदिरातील गणेश मूर्ती गणेशोत्सवा दरम्यान दहा दिवस गणेश मंडळाच्या मंडपात ठेवली जाते. यावेळी लाखो भक्त गणरायाच्या दर्शनासाठी येतात.