पुणे – नवीन वर्षाच्या स्वागताला अगदी काही तासाच उरले आहे. कोरोनाचा धोका असला तरी नवीन वर्षाचे दमदार स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. अनेक बेतही ठरले आहेत. मात्र नववर्षाच्या पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष असणार आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच विशेष पथकांची नेमणूक केली आहे.
अशी करणार पाहणी
शहर व शहरातील परिसरात मद्याच्या विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये. यासाठी ही पथके पाहणी करणार आहेत . संशयित ठिकाणी या छापे टाकले जाणार आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील विविध उपाहारगृह , हॉटेल्स येथे पार्ट्यांचे आयोज केले जाते. अश्या ठिकाणी भेसळ युक्त मद्यविक्री करण्यावरही भर दिला जातो. अशाच भेसळ युक्त मद्यविक्रीला रोख लावण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. पार्ट्यांमध्ये आणण्यात आलेल्या मद्याचा दर्जा , मद्य पुरविणारे ठिकाण याची माहिती यापथकांकडून घेतली जाणार आहे.
मद्य पिण्यासाठी परवाना घेणे आवश्यक
31 डिसेंबरला मद्य पिणाऱ्यांची संख्या जास्त असते. मात्र मद्यपान परवाना न घेताच नागरिक मद्यसेवन केले जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यपान परवाने दिले जातात. यामध्ये एका दिवसापासून ते वर्षभरासाठी हा परवाना घेता येतो. इतकंच नव्हे तर आजीवन मद्यप्राशनाचा परवानाही मिळतो. मात्र विना परवाना मद्य प्राशन केलेला कोणी आढळल्यास त्यांच्यसह हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे मद्य परवाना घेणे आवश्यक आहे.
कोरोनाची अशी आहे नियमावली
ओमिक्रॉन व कोरोनाच्या पार्श्वभूमी हॉटेलचे नियम कडक करण्यात आले आहेत. रात्रीनऊ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उपाहारगृहे आणि बिअरबारमध्ये 50 टक्के ग्राहकांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याच्यावरही कारवाई होणार आहे.
असा मिळवा ऑनलाईन मद्यपान परवाना
मद्यपान परवान्याचे हे आहेत दर
work from home | मुलांसोबत राहून कठीण जातोय वर्क फ्राम होम; या पाच टिप्स तुमचे काम करतील सोपे
‘मुझे आपसे प्यार हो गया और…’, नुसरत जहाँने पहिल्यांदाच सांगितली यश दासगुप्तासोबतची ‘लव्हस्टोरी’
सिंगल चार्जमध्ये 150KM रेंज, One-Moto ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च