सतर्क राहा, पण तिसऱ्या लाटेचा विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका; अजितदादांचा अधिकाऱ्यांना कानमंत्र

| Updated on: Jul 31, 2021 | 3:19 PM

अजित पवार यांनी बारामतीमधील विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. (ajit pawar)

सतर्क राहा, पण तिसऱ्या लाटेचा विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका; अजितदादांचा अधिकाऱ्यांना कानमंत्र
ajit pawar
Follow us on

बारामती: कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. पण तिसऱ्या लाटेचा सामना करताना विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (don’t stop development work in covid third wave situation, says ajit pawar)

अजित पवार यांनी बारामतीमधील विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोनाच्या चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश पवार यांनी दिले.

पॉझिटिव्हीटी रेट वाढू देऊ नका

सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्हीटी रेट वाढणार नाही याची दक्षता घ्या. नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना प्रादुर्भावाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा सूचनाही त्यांनी केल्या. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाची नवीन इमारत, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभिकरण, क्रीडा संकुल, देसाई इस्टेट येथील रस्त्याची पाहणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नविन विश्रामगृह इत्यादी कामाची पाहणी केली. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यात अशा सूचना दिल्या.

पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य रवाना

बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे 50 हजार रुपयांचे रेनकोट दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठवण्यात आले.

सिद्धिविनायक तरुण मंडळ जाचक वस्ती , सणसर (ता. इंदापूर) यांच्या तर्फे 50 हजार रुपयांचे रेनकोट व भाजीपाला दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.

सिल्व्हर ओक युवा प्रतिष्ठान सणसर (ता. इंदापूर) यांच्या तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे 250 फूड पॅकेट. दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.

अविनाश लगड मित्र मंडळ बारामती यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे 70 फूड पॅकेट. बोर्गेवाडी व जुगाईवाडी तारळे विभाग (ता. पाटण) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.

फेरोरा इंडिया मित्र परिवार, क्षेत्रीय ट्रेकर्स, व क्रिकेट क्लब बारामती यांच्या तर्फे चिपळूण, महाड व रायगड पुरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे 350 फूड पॅकेट पाठविण्यात आले.

केंद्रसरकारच्या राष्ट्रीय दुग्ध विकास योजनेच्या माध्यमातून बारामती तालुका सहकारी दूध संघाला261 अडल्टरेशन किट व 74 एएमसी युनिट मिळाले त्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. (don’t stop development work in covid third wave situation, says ajit pawar)

 

संबंधित बातम्या:

महापुरामुळे रायगडचं 800 कोटींचं नुकसान, आता जिल्ह्याला कोरोना आणि साथीच्या आजारांचा विळखा

सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना साद

सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट? केरळमध्ये स्फोट, महाराष्ट्रातही आकडा वाढतोय, वाचा सविस्तर

(don’t stop development work in covid third wave situation, says ajit pawar)