नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरुपदी पुण्यातील डॉ. मनोहर चासकर

| Updated on: Feb 21, 2024 | 3:53 PM

Pune News | डॉ. चासकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात बीएस्सी, एमएस्सी; तसेच पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी जपानमधील नागोया विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट केले आहे.

नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरुपदी पुण्यातील डॉ. मनोहर चासकर
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे दि. 21 फेब्रुवारी 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिष्ठाता; तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (स्वारातीम) कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. चासकर यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा सुमारे ३५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे.

डॉ. चासकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात बीएस्सी, एमएस्सी; तसेच पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी जपानमधील नागोया विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट केले आहे. नागोया विद्यापीठांमध्ये व जर्मनीच्या हॅनोवर या विद्यापीठांमध्ये व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून अनेकदा कार्य केले आहे. डॉ. चासकर यांनी पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद, अधिसभा, मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये काम केले असून, विद्यापीठात अधिष्ठाता म्हणूनही काम केले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीवरही त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. डॉ. चासकर यांचा संशोधनाचा विषय नॅनो मटेरिअल्स अँड अँप्लीकेशन, फोटो कॅटलिसिस, सिंथेसिस ऑफ फोटो कॅटलिसिस अँड स्टडी इट्स एन्व्हायरोन्मेंटल इन द प्रोसेस ऑफ युव्ही लाइट या क्षेत्रात आहे.

डॉ.चासकर यांच्या नेतृत्वाखाली मोरे कॉलेज ला NACC A+ मानांकन, पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळालेला आहे. आणि सुयोग्य मार्गदर्शनामुळेच महाविद्यालय स्वायत्त होऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वीरित्या राबविणारे पिंपरी चिंचवड महानगरातील सर्वप्रथम महाविद्यालय ठरले आहे. प्राध्यापक पेशापासून ते कुलगुरू पर्यंतची वाटचाल आदर्शवत आहे, प्रेरणादायी आहे. कार्यकर्तृत्वाने एकेक शिखर पादाक्रांत करीत विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रातील उच्चतम पदावर पोहोचण्याचा सन्मान मिळाला.एक समाजरत्न ज्याचा प्रचंड अभिमान वाटावा.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी नेत्रदीपक भरारी डॉ.मनोहर चासकर यांनी घेतली आहे.