मुंबई : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व परिवर्तनवादी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड झाल्याबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. समतेच्या चळवळीचे खंदे पाठीराखे, राज्यघटनेचे अभ्यासक व लोकशाही मूल्य जपणारे कसबे यांची फेरनिवड मसापला देशपातळीवर घेऊन जाईल, असे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले. (Dr. Raosaheb Kasbe re-elected as president of Maharashtra Sahitya Parishad, Nitin Raut Congratulates)
गेल्या कित्येक वर्षांपासून डॉ. कसबे हे दलित व परिवर्तनवादी चळवळीचे खंदे समर्थक राहिले असून आपल्या वैचारिक लिखाणाने त्यांनी मराठी साहित्य विश्वाला व संस्कृतीला समृध्द केले आहे.
मराठी साहित्याच्या सेवेत केवळ महाराष्ट्र व देशपातळीवरच नव्हे तर, जगभर विखुरलेल्या विविध संस्थांमध्ये पुण्याच्या ‘मसाप’चे स्थान गौरवाचे आहे. कसबे यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने मसाप साहित्य रसिकांना एका नव्या पातळीवर घेऊन जाईल, असा आशावाद डॉ राऊत यांनी व्यक्त केला आहे.
ज्या पेगाससवर संसदेत रान उठलं, त्यावर केंद्र सरकारचा लोकसभेतच खुलासा; अश्विनी वैष्णव म्हणाले…https://t.co/nIhVKYCQBh#AshwiniVaishnaw | #Congress | #BJP | #PegasusSpyware | #Pegasus
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2021
इतर बातम्या
फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा; सचिन सावंत यांची मागणी
(Dr. Raosaheb Kasbe re-elected as president of Maharashtra Sahitya Parishad, Nitin Raut Congratulates)