Lalit Patil | भूषण पाटील चालवत असलेला कारखान्याचा मालक कोण…भाड्याचे पैसे…

| Updated on: Oct 23, 2023 | 2:52 PM

Lalit Patil | ललित पाटील याने भूषण पाटील याला ड्रग्सचा कारखाना नाशिकमध्ये टाकण्यासाठी मदत केली. हा कारखाना भूषण पाटील याने भाड्याने घेतला होता. या प्रकरणात ललित पाटील याची भूमिका महत्वाची होती.

Lalit Patil | भूषण पाटील चालवत असलेला कारखान्याचा मालक कोण...भाड्याचे पैसे...
Lalit Patil
Follow us on

मुंबई, पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : पुणे ससून रुग्णालयातून ललित पाटील याचे ड्रग्स रॅकेट उघड झाले होते. या रॅकेटमध्ये अटक झालेल्या आरोपींची संख्या १५ झाली आहे. पोलिसांच्या रडारवर अजून अनेक जण आहेत. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना कसा टाकला? त्यासाठी ललित पाटील याची त्याला कशी मदत झाली? अजून या प्रकरणात काय चौकशी राहिली आहे? या सर्व बाबींचा खुलासा मुंबई पोलिसांनी अंधेरी न्यायालयात केला. त्यानंतर ललित पाटील याच्यासह चौघांना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.

आज काय झाले कोर्टात

अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात ललित पाटील याची पोलीस कोठडी वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अर्ज केला. त्यात ललित पाटील, सचिन वाघ, शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी या सर्वांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली. सरकारी वकिलांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासात सचिन वाघ याने सांगितले की, त्याने एमडी ड्रग्सच्या साठ्याची विल्हेवाट लावली आहे. ललित पाटील यांच्या निर्देशावर त्याने हे काम केले. परंतु सचिन वाघ याने ड्रग्सची खरंच विल्हेवाट लावली आहे की अजून कुठे लपवून ठेवला आहे, हा तपास करायचा आहे.

दोघांची समोरासमोर चौकशी

ललित पाटील याच्या सांगण्यावरून त्याचा भाऊ भूषण पाटील हा ड्रग्सचा व्यवसाय चालवत होता. या दोघांची आम्हाला सामोरासमोर चौकशी करायची आहे. या प्रकरणात एकूण 15 आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे. हे प्रकरण अधिकच गंभीर आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी हवी असल्याचे न्यायालयात मांडण्यात आले.

हे सुद्धा वाचा

ड्रग्स कंपनीचा मालक कोण ?

न्यायालयाने ड्रग्स कंपनी चालत असलेल्या कारखान्याचा मालक कोण आहे? हा प्रश्न विचारला. यावेळी सरकारी वकिलांनी कांबळे नावाचा व्यक्ती असल्याचे उत्तर दिले. एमआयडीसीने कांबळे या व्यक्तीच्या नावे लिजवर ही जागा दिली आहे. हा कारखाना भूषण पाटील याने चालवण्यासाठी घेतला होता. कांबळे या व्यक्तीने यादव या व्यक्तीला कारखाना चालवायला दिला होता. भूषण पाटील याने यादवकडून कारखाना चालवण्यास घेतला. तो यादव यांना गुगल पे आणि फोन पे या माध्यमातून भाड्याची रक्कम देत होता.