पुणे : एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांनी जेव्हापासून महाविकास आघाडीला युतीची साद घातलीय तेव्हापासून राजकारण पुन्हा तापलंय. भाजपने (BJP) शिवसेनेला (Shivsena) पुन्हा हिंदुत्वावरून डिवचायला सुरू केलंय. विरोधी पक्षनेतेही कालपासून शिवसेनेवर याच मुद्द्यावरुन जोरदार हल्लाबोल चढवत आहेत. आज पुन्हा त्यांनी शिवसेनेचा उल्लख लाचार म्हणून केला आहे. शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकली, असा जोरदार घणाघात शिवसेनेवर केला आहे. आणि सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलेत, त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये, असाही पलटवार त्यांनी केलाय. जेव्हापासून भाजप शिवसेनेची युती तुटलीय तेव्हापासून भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचत आहे. आता भगव्यासाठी फक्त भाजप आहे, असे भाजप नेते वारंवार सांगत आहेत.
भाजपचा इतिहास हिंदुत्वाचा
तसेच यावर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांनी एमआयएमसोबत जावं किंवा नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांचे लोकं आज जनाब बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत, अजान स्पर्धा घेत आहेत. राष्ट्रीय प्रश्नावर ते मोदींना विरोध करत आहेत, मात्र 370 कलम हटवलं तेव्हा संपूर्ण देश एक होता, तेव्हा हे विरोध करत होते. त्यांना इतिहास माहिती नाहीये, 370 कलम हटवणारी भाजप आहे, राम मंदिर बांधणारी भाजप आहे, लाल चौकात तिरंगा लावायला शिवसेना नव्हती गेली भाजप गेली होती, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.
संजय राऊत काय म्हणाले?
भाजपच्या टीकेला संजय राऊतांनी सकाळीच उत्तर दिले होते, त्यानंतर फडणवीसांनी हा पलटवार केलाय. खरे जनाब सेनावाले कोण आहेत, हे महाराष्ट्रात जाऊन शिवसेना खासदार सांगणार आहेत. एमआयएमला कोण युती मागितली. खरे तर एमआयएम आणि भाजपची हातमिळवणी झाली आहे. भाजपने शिवसेनेची बदनामी करा, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा असा आदेश एमआयएमला दिला आहे. हा कट शिवसेनेने उधळून लावला आहे. याविरोधातच आता शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. त्यातून सारा महाराष्ट्र पिंजून काढू आणि खरी जनाब सेना कोण, हे साऱ्यांना सागू, असा इशारा रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला.
गडकरींना लतादिदी आणि अटलजी यांची आठवण आली, म्हणाले मी दोनदाच हार खरेदी केला…
काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला