Cricket World cup 2023 | पुणे स्टेडियमवर किती वर्षांनी होणार वर्ल्डकपचे सामने, MCA मध्ये रंगणार

| Updated on: Oct 05, 2023 | 2:48 PM

Cricket World cup 2023 | वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार आजपासून रंगणार आहे. भारताच्या वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात अजून तीन दिवस असले तरी सर्वत्र क्रिकेटमय वातावरण झाले आहे. पुण्यात मोठ्या कालखंडानंतर क्रिकेटचा थरार रंगणार आहे.

Cricket World cup 2023 | पुणे स्टेडियमवर किती वर्षांनी होणार वर्ल्डकपचे सामने, MCA मध्ये रंगणार
Follow us on

पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : जागतिक क्रिकेट करंडक स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. वर्ल्ड कपआधी वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2-1 ने असा विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाचे मनौधर्य वाढले आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघाची जोरदार तयारी झाली आहे. रोहित अँड कंपनी आपले सर्वच कौशल्य या स्पर्धेत दाखवणार आहे. दरम्यान पुणे शहरात दीर्घ कालावधीनंतर वर्ल्डकपचा सामना होणार आहे.

किती वर्षांनी पुण्यात होणार सामने

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचा सामना तब्बल 27 वर्षांनी पुणे शहरात होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 1996 मध्ये विश्वचषकाचा सामना झाला होता. वेस्ट इंडिज विरुद्ध केनियात हा सामना रंगला होता. त्यानंतर 2011 मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा झाली. परंतु पुणे स्टेडियमवर एकही सामना झाला नाही. आता 2023 मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर पाच सामने होणार आहे.

एमसीएकडून मोठ्या प्रमाणावर तयारी

पुणे येथील होणाऱ्या सामन्यांसाठी एमसीएकडून मोठी तयारी केली गेली आहे. या सामन्यांसाठी पुणे शहरात देशभरातून क्रिकेट प्रेमी येणार आहेत. यामुळे अनेकांनी आपले हॉटेल आणि तिकीटे बुक केली आहेत. सामन्यांच्या दिवशी पुणे शहरातील हॉटेलचे दर वाढले आहे. त्यानंतर सर्व हॉटेल फुल्ल झाले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सामन्यांची पूर्ण तयारी झाली असल्याचे म्हटले आहे. दिवसा असणाऱ्या या सामन्यांसाठी पाणी, शौचालय, पार्किंग ही सर्व व्यवस्था केली गेली आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात सर्वाधिक सामने

विश्वचषकाचे सर्वाधिक सामने महाराष्ट्रात होणार आहे. राज्यात 10 सामने होणार असून त्यातील पाच सामने पुणे शहरात होणार आहे. उर्वरित पाच सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित पवार यांनी आपला आवडता खेळाडू विराट कोहली असल्याचे म्हटले. भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा, अशी अपेक्षा इतर क्रिकेटप्रेमींबरोबर मलाही असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.