इंदापूर – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya bharne) आपल्यास सहज,साधेपणाने वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आपल्या कामाच्या बाबतीतही जाते अधिक सजग असलेल्या पहिली मिळतात. यामुळेच ते ग्रामीण भागात ते प्रसिद्ध आहेत. अनेकदा छोट्यात छोट्या कार्यकर्त्यालाही दत्तात्रय मामा आपले वाटतात. असाच प्रसंग इंदापूर(Indapur) तालुक्यातील डिकसळ येथे घडला आहे. इंदापूर तालुक्यातील डिकसळ (Diksal)येथे गावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे खूष झालेल्या गावकऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली आहे. ग्रामस्थांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच आज हलगीच्या निनादात घोड्यावरुन जंगी मिरवणूक काढली. डिकसळ या गावी 4 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने मंत्री भरणे त्याठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत मिरवणूक काढली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांची ही घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
मटणावर मारला ताव
काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील निरवांगी या गावी 30 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभसाठी ते गेले होते . त्यावेळी जेवणचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गावकऱ्यांच्या पंगती बसल्या होत्या व उपस्थित पदाधिकाऱ्यांना जेवणासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चक्क गावकऱ्यांच्या सोबत पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे भरणे यांचा साधेपणा पुन्हा समोर आला आहे.