पुणे: राज्यातील पाच महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी 94447 अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये पुण्यातील 18565 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतेय.
या प्रक्रियेतंर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज सबमिट करणे यासाठी 22 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.
उच्च न्यायालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची (11th Admission) सीईटी (CET) रद्द केल्यानंतर आजपासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया (11th Admission Process) सुरू करण्यात आली होती. पुणे (Pune), पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad) या भागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. १४ ते २२ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जांची छाननी, दुरुस्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सगळी माहिती 11thadmission.org.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केंद्रेही तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी ५३ मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अडचणी सोडवण्यास मदत केली जाणार आहे.
या सेंटर्सशी संपर्क साधल्यानंतर तिथले प्रतिनिधी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करतील. https://pune.11thadmission.org.in/ या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुण्यातल्या सर्व ५३ मार्गदर्शन केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. तुमच्या झोननुसार तुम्ही या केंद्रांवर जाऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपल्या अडचणी सोडवता येतील.
संबंधित बातम्या :