पुणे : G20 Summit Pune |पुण्यात जानेवारीमध्ये होणाऱ्या जी २० परिषदेसाठीच्या तयारीने वेग घेतला आहे. या तयारीची पाहणी करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पाहणी केली. जी २० परिषदेतील काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार जी २० परिषदेच्या बैठकीच्या तयारीसंदर्भातील काम किती पुर्ण झाली, त्याचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी विविध प्रकारच्या सूचना दिल्या.
कधी होणार पुण्यात बैठक
महाराष्ट्रात मुंबई नंतर आता पुण्यात जी २० देशांची परिषद होतंय. पुण्यात जानेवारी आणि जूनमध्ये तीन बैठका होणार आहेत. या बैठकींसाठी ३४ देशांचे १२० ते १३० प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. पहिली बैठक १५ ते १७ जानेवारीदरम्यान होणार आहे. या बैठकीला आता आठवडाभराचा कालावधी राहिला आहे. यामुळे महापालिका, प्रशासन व पोलिस विभागाची कोणती कामे झाली आणि किती कामे राहिली आहे, त्याचा आढावा घेण्यात आला.
पाहुण्यांच्या ऐतिहासिक भेटी
पुण्यात होणाऱ्या जी २० बैठकीसाठी १४ जानेवारीपासून प्रतिनिधी येणार आहेत. त्या प्रतिनिधींचा १८ जानेवारीपर्यंत पुण्यात मुक्काम असणार आहे. विदेशातून येणाऱ्या या प्रतिनिधींसाठी जाधवगढी आणि शनिवारवाड्याची भेटीचे नियोजन केले आहे.