पुणे : पुण्याच्या वाघोलीमधील गाडे कुटुंबीयांनी आज आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांना सोन्याची राखी (Gold Rakhi) अर्पण केली आहे. आज रक्षाबंधन आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रक्षा बंधन (Raksha bandhan) या पवित्र सणाला काही तरी वेगळे करावे, अशी इच्छा आईच्या आणि मुलींच्या मनात आल्याने आम्ही माऊलींना सोन्याची राखी अर्पण केल्याची भावना संपत गाडे यांनी व्यक्त केली. आज संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) यांच्या समाधीची विधिवत पूजा करत गाडे कुटुंबीयांनी माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण केली आहे. यावेळी गाडे कुटुंबातील सर्वच जण यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी तसेच राखी अर्पण करण्यासाठी मंदिरात आले होते. विधीवत पूजा करून सोन्याची सुबक अशी राखी गाडे कुटुंबाने माऊलींना अर्पण केली.
आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन हा भावा-बहिणीचा सण. दरवर्षी आपण हा सण साजरा करतोच. मात्र यावेळी काहीतरी अधिक चांगले करण्याच्या हेतूने आम्ही माऊलींच्या मंदिरात आलो. माऊली आपल्यासाठी खूप काही करतात. एक धागा घट्ट ठेवलेला असतो. तसे आपलाही घट्ट धागा त्यांच्यासोबत आहे. तो सदैव राहण्यासाठी हा उपक्रम केला. राखी कोणतीही असो, साधी असो वा सोन्याची. उद्देश मात्र एकच असतो, असे गाडे कुटुंबातील सदस्य स्नेहा गाडे म्हणाली.
आज महिलांसाठी एक असा पवित्र असा दिवस असतो. रक्षाबंधनानिमित्त आम्हीही एक चांगला उपक्रम करायचे ठरवले. माऊलींनी जे काही ज्ञान दिले आहे, तो वारसा पुढे जात आहे. आज आमच्या आईच्या आणि मुलींच्या मनात आले, की रक्षाबंधनाच्या दिवशी माऊलींना आपण सुवर्ण राखी बांधू. ही राखी 2 तोळ्याहून जास्त सुवर्ण राखी आहे. माऊली आपल्याला खूप काही देतात. त्यामुळे आम्हाला हे छोटेसे काहीतरी देण्यातही समाधान आहे, अशी प्रतिक्रिया संपत गाडे यांनी व्यक्त केली. माऊलींच्या समाधीवर यावेळी पांढरे शुभ्र वस्त्र, फुले त्याचप्रमाणे नंतर कुटुंबातील महिला भगिणींनी राखी अर्पण केली.