मनोज गाडेकर, सुरेगाव,अहमदनगर : स्टेजवर गौतमी पाटील बैलगाडा या गाण्यावर नाचत होती. त्यावेळी तिला टक्कर देणारा तरुण स्टेजखाली नाचत होता. एकीकडे गौतमीचे नृत्य पाहून सर्वजण तिच्यासोबत सेल्फी घेत होते तर दुसरीकडे तिला पाहून नाचणारा हा तरुण अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. मग काय त्याच्या या भन्नाट नृत्याची चर्चा सुरु झाली. पठ्ठ्यानं लावणीमध्ये गौतमी पाटील हिलाही मागे टाकले, सोशल मिडीयावर पवनच्या जुगलबंदीला दाद मिळतेय. या तरुणाचे नाव आहे पवन चव्हाण. कोण आहे पवन चव्हाण?
गौतमी पाटील हिला टक्कर देणारा पवनचा भन्नाट डान्स#Gautamipatil #Dance pic.twitter.com/Moo8BE7vxI
हे सुद्धा वाचा— jitendra (@jitendrazavar) March 28, 2023
पवनचा व्हिडिओ व्हायरल
गौतमी पाटील ही तिच्या नृत्यासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. तिचे नृत्य सुरू होताच मंचासमोर उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारतो. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मंचावर गौतमीचा डान्स सुरू असताना मंचासमोर पवन चव्हाण या तरुणाने गौतमी सारखा डान्स करून सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. त्याच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. तो म्हणाला, मी डेअरिंग केली आणि नाचलो…
गौतमी पाटील सारखा भन्नाट डान्स पवन याने करुन लक्ष वेधले#Gautamipatil pic.twitter.com/fES9fmIX1J
— jitendra (@jitendrazavar) March 28, 2023
कोण आहे पवन
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे राहणारा पवन चव्हाण हा १९ वर्षीय तरुण. वडील रामसिंग हे सेंटरींग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने पवनने सातवीतच शिक्षण सोडलं आणि पानटपरी चालवू लागला. मात्र नृत्याची आवड असल्याने तो गेल्या तीन वर्षांपासून नृत्य शिकतोय.
मोबाइल झाल गुरु
विशेष म्हणजे कुठलेही क्लास न लावता तो घरी मोबाईलवर बघूनच नृत्य शिकलाय. त्याची आवड आणि कला बघून कुटुंबिय देखील त्याला प्रोत्साहन देतात. कोपरगाव आणि आजूबाजूला छोटे-मोठे सांस्कृतिक कार्यक्रमात पवन आपली कला सादर करतो. त्याला काही पुरस्कार देखील मिळाले असून भविष्यात मोठी संधी मिळावी असे त्याचे स्वप्न आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असतानाच तिच्यासमोर पवनने ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यावर हुबेहूब नृत्य केले आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
नगरच्या कोळपेवाडीत श्री महेश्वर फेस्टिव्हल पार पडला. या फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला होता. यावेळी हजारो तरुण जमले. प्रचंड गर्दी झाली. जिथे नजर टाकू तिथे पब्लिक दिसत होती. गौतमीचा डान्स सुरू होताच एक कल्ला झाला. गोंगाट सुरू झाला. शिट्ट्यांचा पाऊस पडला. गौतमी गौतमीचा आवाज घुमला… गौतमीच्या अदा… ठेका आणि नजाकत पाहून तरुणाईंनेही आहे त्या ठिकाणी उभं राहून ठेका धरला. तरुणच नव्हे तर महिलाही मोठ्या संख्येने गौतमीच्या कार्यक्रमाला आल्या होत्या.