पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | पुणे शहरातून खुनाचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे वाघोली परिसरात एका महाविद्यालयीन युवकाचा खून झाला आहे. कोयत्याने वार करुन हा खून झाला आहे. खून करणारा त्या युवकाचा गे पार्टनर होता. समलैगिंक संबंधास नकार दिल्यानंतर हा खून झाला आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात हादरा बसला आहे. मृत युवकाचे नाव महेश साधू डोके असून खून करणारा त्याचा गे पार्टनर सागर गायकवाड आहे. सागर गायकवाड हा ठेकेदार आहे.
महेश डोके बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच राहतो. हॉस्टेलजवळ राहणारा ठेकेदार सागर गायकवाड याच्याशी त्याची मैत्री झाली. थोड्याच काळात दोघांमध्ये समलैंगिक संबंध तयार झाले. काही दिवसांनी सागर गायकवाड याने महेश डोके याच्यासंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु महेश डोके याने नकार दिला. त्याचा राग सागर गायकवाड याला आला. मंगळवारी दुपारी दोन वाजता आरव ब्लिस सोसायटीच्या मैदानावर गायकवाड याने डोकेला गाठले. त्यानंतर कोयत्याने त्याच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले आणि तो फरार झाला. महेश डोके याच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरु केली. त्याचवेळी महेश डोके याने समलैंगिक संबंध आणि आरोपी सागर गायकवाड याचे नाव सांगितले. महेश याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कृष्णकांत कमलेश कुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सागर गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहे. साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहे. जून महिन्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिचा खून तिचा मित्र राहुल हंडोरे हिने केला होता. तो खून प्रेम प्रकरणातून झाला होता.