रणजित जाधव, पुणे : आनंद, उत्साह व्यक्त करण्यासाठी कधी वय आडवे येत नाही. फक्त निमित्त हवे असते. मग तब्बल ७० वर्षांनी एकत्र आल्यावर आनंद किती होणार? याची कल्पना तुम्हाला येणार नाही. पुण्यातील हे आजी- आजोबा आता जवळपास ८५ वर्ष वयाचे. सर्वांमध्ये एक कॉमन दुवा आहे. यामुळे ती मंडळी एकत्र आली अन् धमाल मस्ती केली. पुणे शहरातील या प्रकारामुळे पुणे तेथे काय उणे? असेच म्हणावे लागेल.
सध्या सोशल मीडियामुळे जुने मित्र एकत्र येऊ लागले आहे. त्याचे स्नेह संमेलन होत आहे. परंतु ही मंडळी युवा..अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वी त्यांची शाळा किंवा कॉलेज संपले. परंतु पुणे शहरात दहावीतील विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी गेट टुगेदर केले. परंतु हे दहावीचे विद्यार्थी १९५४ च्या बॅचचे होते. म्हणजेच तब्बल ७० वर्षांनी ही मंडळी एकत्र आली. कोणी राज्यात होते, कोणी देशाच्या दुसऱ्या शहरात होते. मग सर्वांना आठवले ते शाळेतील दिवस… सर्वांना लहानपण देग देवा…चा अनुभव आला. मग बिधधास्त होत गप्पा रंगल्या. गेम खेळले गेले. गाणी म्हटली गेली… अगदी किशोरवयीन असल्याचा अनुभव या मंडळींनी घेतला. अन् ८५ व्या वर्षी नाचलेसुद्धा…
तब्बल ७० वर्षांनी सर्व जण एकत्र भेटले. मग गप्पांचा फडही रंगला. कोणी शाळेत असताना कसे होते, किती खोड्या करायचे, आपले शिक्षक-शिक्षिका कसे होते, शिक्षकांनी आपणास कसे घडवले…अशा गप्पा सुरु झाल्या. मग आजी-आजोबांचे मुले अन् नातवंडे यांची चर्चा झाली. वय विसरुन झालेली दंगा, मस्ती झाली. खाणेपिणे झाले. मग अशा या क्षणाचा एक धमाल व्हिडिओ काढला गेला अन् तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अन् पाहता पाहता तो प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी काँमेंट नोंदवल्या. या ग्रुपचे एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर पाहून मराठीतील दुनियादारी या चित्रपटाची आठवण झाली. अन् त्या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आठवला.. तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी…