पुणे : पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी थरार झाला होता. कोयता हातात घेऊन तरुणीवर हल्ला करण्यासाठी युवक धावत होता. ती युवती आपला जीव वाचवण्यासाठी धावत होती. ती तरुणी जीव वाचवण्यासाठी एका बेकरीतही घुसण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तो थरार पाहून त्या व्यक्तीने शटर बंद केले. यावेळी तिला लेशपाल जवळगे या युवकाने धाडसाने तिला वाचवले. त्यानंतर लेशपाल जवळगे याचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्याचवेळी जवळ पोलीस चौक असली तरी पोलीस चौकीत पोलीस नव्हते. त्यामुळे पोलिसांवर टीका होत आहे. त्या तरुणीवर हल्ला करणारा तो तरुण कोण आहे? दोघांची ओळख होती का? यासंदर्भात त्या युवतीने माहिती दिली.
तरुणीवर कोयताने हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव शांतनु जाधव आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याच्यासंदर्भात बोलताना ती युवती म्हणाली की, आम्ही दोघे कॉलेजमधील मित्र होते. त्याने मला प्रपोज केले. परंतु मी नकार दिला. त्यानंतर मी त्याच्याशी संवाद बंद केला. मग त्याने मला धमक्या देणे सुरु केले. तो मला ठार मारण्याची धमकी देत होता. तो माझ्या कॉलेजजवळ येऊन सतत मला फोन करत होता. मला मारहाण करत होता. मी नकार दिल्यानंतर सतत तो माझ्या मागे लागला होता. त्याचा हा प्रकार वाढल्यानंतर मी त्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांकडेसुद्धा केली. परंतु त्याची कुटुंबियांनी काहीच पावले उचलली नाही. मी तक्रार केल्यामुळे त्याने माझ्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे माझ्या हातावर अन् डोक्यावर टाके टाकावे लागले. माझी काहीच चूक नसताना त्याने माझ्यावर हल्ला केला. माझ्या कॉलेजजवळ भरदिवसा कोयताने माझावर हल्ला झाला.
पुणे येथील सदाशिव पेठेत घडलेल्या या प्रकारनंतर पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. कारण हल्ला झाला त्या ठिकाणावरुन काही अंतरावर पोलीस चौकी होती. ती युवती धावत जाऊन त्या ठिकाणी गेली. परंतु पोलीस चौकीत पोलीस नव्हते. अखेर नागरिकांनी तिला पोलीस चौकीत बंद करुन बाहेरुन दार लावले. या प्रकारामुळे पुणे शहरातील पोलीस चौक्या कशासाठी आहेत? असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहे. आता या टीकेनंतर पोलिसांनी पुणे शहरांमधील महाविद्यालयांमध्ये जाऊन पोलिसांनी उपक्रम सुरु केला आहे. पोलिसांनी युवक अन् युवतींमध्ये जागृकता निर्माण करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी काही टीप्स जारी केल्या आहेत.
हे ही वाचा…
पुणे दर्शना पवार अन् कोयता हल्ला प्रकरणानंतर पोलीस खळबळून जागे, काय सुरु केला उपक्रम