शेतकऱ्यांचे बँकेतील सोने घटले कसे? एक दोन नव्हे तर १३ शेतकऱ्यांचे सोने झाले कमी

| Updated on: Apr 20, 2023 | 2:52 PM

sangali : शेतकऱ्यांनी बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आढळून आली आहे. एक, दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकऱ्यांचे सोने कमी झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर बँकेने चौकशी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचे बँकेतील सोने घटले कसे? एक दोन नव्हे तर १३ शेतकऱ्यांचे सोने झाले कमी
Image Credit source: tv9 network
Follow us on

सांगली : शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 200 शेतकऱ्यांनी या शाखेत सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या गहाण ठेवल्या होत्या. त्यामुळं प्रत्येक शेतकरीबाबत असा प्रकार घडला आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात बँकेकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. आता सोने घटले कसे? याचा शोध बँक घेणार आहे. तसेच शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे प्रकार

शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कवठेएकंद शाखेत समोर आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कवठेएकंद शाखेत गहाण ठेवलेल्या या शेतकऱ्यांनी सोन्याच्या वजनात घट आढळून आल्याची तक्रार केलीय. सर्वप्रथम बँकेचे ग्राहक विश्वासराव माधवराव पाटील यांनी कवठेएकंद शाखेत सोन्याची अंगठी गहाण ठेवली होती. १२ एप्रिल रोजी त्यांनी दागिना सोडविल्यानंतर त्यात घट झाल्याचे त्यांना आढळून आले. हे प्रकरण सुरू असतानाच आणखी एका कर्जदार ग्राहकानेही बँकेमध्ये गहाण ठेवलेल्या दोन पिळ्याच्या अंगठीचे वजन कमी भरल्याची तक्रार केली आहे.

हे सुद्धा वाचा

चौकशीसाठी अधिकारी बँकेत

सोन्याचे वजन कमी भरल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा बँकेच्या मुख्यालयातून अधिकाऱ्यांना घेतली. चौकशीसाठी अधिकारी कवठेएकंद शाखेत पाठविण्यात आले. कवठेएकंद शाखेत एकूण 200 शेतकऱ्यांनी सोन्याचे वेडन गहाण कर्ज घेतले. यातील 13 शेतकऱ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला असून एकूण 7 ग्रॅम बाबतीत प्रकार घडलाय.

त्या व्यक्तीची बदली

या प्रकरणी ज्या व्यक्तीवर संशय आहे त्या व्यक्तीची बँकेने तात्काळ बदली करत चौकशी सुरू केले आहे. तसेच शेतकऱ्यांची जितकी घट झाली आहे, तितकी भरपाई चौकशीनंतर देण्यात येणार आहे. तक्रारदार शेतकऱ्यांना बँक तात्काळ घट झालेले पैसे देणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले. तसेच सोन्यात कशामुळे घट आली, त्याची कारणे काय, कोणाचा त्यात हस्तक्षेप आहे का, या अनुषंगाने चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत सोने गहाण ठेवण्याच्या पद्धतीत देखील बदल केला जातोय असे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा

पुणे शहरातील लोकांना काय आवडते | देशी मद्य, विदेशी मद्य, वाईन की बियर?

पुणेकरांना मंत्रिमंडळाची मोठी भेट, वर्षभरात होणार मोठी बचत