पुणे: एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रं द्या, अन्यथा मुंबईत येऊन उग्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. जूनमध्ये झालेल्या परीक्षेचं नियुक्तीपत्रं देण्याने कोरोना नियमांचा फज्जा कसा उडेल?, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला आहे. (gopichand padalkar slams maharashtra government Over MPSC Candidates appointment pending)
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्र सरकार पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढत आहे. परवाही पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढलं. आजही काही ठरावीक विद्यार्थी नियुक्तीपत्रं मिळावं य मागणीसाठी आंदोलन करत होते. पण कोरोनाचं कारण देऊन या विद्यार्थ्यांवर दबाव वाढवण्यात आला, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.
आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका
जे विद्यार्थी अधिकारी म्हणून एमपीएससीमध्ये सिलेक्ट झाली आहेत. त्यांना नियुक्तीपत्रं द्यावं, नाहीतर आम्ही मुंबईत आंदोलन करू, असा इशारा देतानाच आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊच देऊ नये, परीक्षा जूनमध्ये झाली. नियुक्ती पत्रं अजून दिली नाहीत. सरकार नऊ महिन्यांपासून झोपा काढत आहे का? वेळीच नियुक्तीपत्रं दिलं तर विद्यार्थी कशाला आंदोलन करतील? असा सवाल त्यांनी केला.
413 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रं द्या
केवळ 413 विद्यार्थांना नियुक्तीपत्रं द्यायचं आहे. त्यासाठी कोरोनाचं कारण देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना केवळ नियुक्तीपत्रं देण्यात येत आहे. नियुक्तीपत्रं दिल्याने कोरोना नियमांचा असा कोणता फज्जा उडणार आहे?, असा सवालही त्यांनी केला.
आरक्षणासाठी गंभीर नाही
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अधिकाऱ्यांची सर्वात मोठी भरती झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार गंभीर नाही. या सरकारने आरक्षणाचा सर्व घोळ करून ठेवला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 79 मराठा मुलं सर्वसाधारण वर्गातून सिलेक्ट झाली आहेत. त्यांच्यावर अन्याय का? इतर वर्गातील मुलांवर अन्याय का? सरकारने या सर्वांना तातडीने नियुक्तीपत्रं द्यावीत, अशी माझी मागणी आहे, असंही ते म्हणाले. (gopichand padalkar slams maharashtra government Over MPSC Candidates appointment pending)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 13 March 2021https://t.co/TMhX8UEerm
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 13, 2021
संबंधित बातम्या:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरुद्ध उमेदवार आक्रमक, रखडलेल्या नियुक्त्या करण्याची मागणी
झारखंडमध्येही भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण; तरुणांना बेरोजगार भत्ताही
नियुक्ती रखडल्याने MPSC पात्र उमेदवारांचं आंदोलन, मात्र पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली
(gopichand padalkar slams maharashtra government Over MPSC Candidates appointment pending)