पुणे | 8 सप्टेंबर 2023 : राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अनेक युवकांचा प्रयत्न सुरु असतात. खासगी क्षेत्रापेक्षा या ठिकाणी असलेल्या सुरक्षिता आणि पगार हा त्यासाठी महत्वाचा विषय ठरतो. यामुळे अनेक युवक सरकारी नोकरीसाठी रात्रंदिवस अभ्यास करुन प्रयत्न करतात. परंतु कधी शासनाच्या सरकारी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. २०१९ मध्ये सुरु झालेल्या प्रक्रियेत असाच फटका विद्यार्थ्यांना बसला होता. त्यासाठी भरलेले शुल्क आता विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे.
जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीसाठी २०१९ मध्ये प्रक्रिया सुरु झाली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले होते. त्यावेळी १३ हजार ५२१ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु झाली होती. त्यात १२ लाख ७२ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र ही भरती प्रक्रिया तीनवेळा पुढे ढकलली. त्यानंतर ती रद्द केली. या प्रक्रियेतून तब्बल २५ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. अखेर ही प्रक्रिया रद्द झाल्यामुळे ते परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना संपर्क केला होता.
रद्द झालेल्या #जिल्हा_परिषद #सरळसेवा परीक्षांचे शुल्क परत करण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांची भेट घेतली होती.दिलेल्या शब्दाप्रमाणे #परीक्षा_शुल्क परत करण्यासंदर्भात परिपत्रक काढल्याबद्दल महाजन साहेबांचे मनस्वी आभार.परंतु जमा केलेल्या परीक्षा फी पैकी केवळ ६५%… https://t.co/F5THRe4Cjs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 8, 2023
शासनाने म्हाडा भरतीसाठी प्रक्रिया केली होती. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये आणि जीएसटी १८० रुपये घेतले होते तर राखीव संवर्गातील उमेदवाराकडून ९०० रुपये आणि १६२ रुपये जीएसटी घेतले होते. या उमेदवारांना जीएसटी आणि अतिरिक्त शुल्क परत मिळणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना संपर्क केला होता. अखेर गिरीश महाजन यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी आभार मानले आहे. परंतु जमा केलेल्या परीक्षा फी पैकी केवळ ६५% रक्कम परत करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. शासनाने सर्वच्या सर्व रक्कम परत केल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.