शरद पवारांची राज्यपालांवर वयावरून बोचरी टीका; राज्यपाल म्हणतात, टीका करायलाच हवी का?

| Updated on: Aug 17, 2021 | 12:21 PM

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोचरी टीका केली होती. (Bhagat Singh Koshyari )

शरद पवारांची राज्यपालांवर वयावरून बोचरी टीका; राज्यपाल म्हणतात, टीका करायलाच हवी का?
Bhagat Singh Koshyari
Follow us on

पिंपरी-चिंचवड: राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोचरी टीका केली होती. राज्यपालांनी मात्र या टीकेवर बोलणं टाळलं. पवार मोठे नेते आहेत, त्यांच्यावर टीका करायलाच हवी का?; असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. (Governor Bhagat Singh Koshyari reply to Sharad Pawar’s criticism)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सिंहगड किल्ल्यावर आले होते. त्यावेळी मीडियांनी त्यांना पवारांच्या टीकेवरून प्रश्न विचारले. यावेळी कोश्यारी यांनी या प्रश्नावर हसून मोजक्याच शब्दात उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोठे व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय टीका करणार? ते आपल्या देशाचे माननीय व्यक्ती आहेत. ते काही बोलले तर आपण त्यांच्यावर टीका करायला हवी का?, असा प्रतिसवाल राज्यपालांनी केला.

प्रत्येकानं सिंहगडावर जावं

यावेळी त्यांनी सिंहगड किल्ल्यावरील अनुभवही विशद केला. सिंहगड किल्ल्याचा अनुभव चांगला होता, प्रत्येकाने तिथं जायला हवं, असं आवाहन त्यांनी केलं.

पवार काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी काल मुंबईत मीडियाशी संवाद साधताना राज्यपालांवर बोचरा वार केला होता. मी राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तुम्ही का विचारताय. मात्र, पत्र गेलेलं आहे. वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल. त्यांनी आधी पत्र दिलं, त्यानंतर शिष्टमंडळही भेटून आलं. आपल्याकडे म्हण आहे शहाण्यांना शब्दाचा मार, अशा शब्दात पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला हाणला होता.

पाहुणचाराने राज्यपाल भारावले

दरम्यान, सिंहगडावर भगत सिंह कोश्यारी यांनी तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. समाधी परिसरात वृक्षारोपण केलं. यावेळी सिंहगडावर राहणार्‍या नागरिकांनी राज्यपाल येणार्‍या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. तसंच त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर wel come लिहिले होतं. तर काही ठिकाणी महिलांनी राज्यपालांचं औक्षण देखील केलं. शिवाय शाल श्रीफळ देत सिंहगडवासियांनी राज्यपालांचा सत्कार केला. सिंहगडवासियांच्या पाहुणचाराने राज्यपाल भारावले. तिथे उपस्थित नागरिकांना त्यांनी उत्तराखंडला येण्याचं आमंत्रण दिलं. आमच्या उत्तराखंडमध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा या तिकडे…. असं म्हणत राज्यपाल पुढे मार्गस्थ झाले. (Governor Bhagat Singh Koshyari reply to Sharad Pawar’s criticism)

 

संबंधित बातम्या:

‘पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल’, 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन शरद पवारांचा राज्यपालांना टोला

अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सर्व मागण्या फेटाळल्या, शेवटचा पर्यायही संपला?

पुणे कोण्याच्या बापाचे नाही, मनसेची धमकी श्रीमंत कोकाटेंनी उडवून लावली, पुन्हा वाद पेटणार?

(Governor Bhagat Singh Koshyari reply to Sharad Pawar’s criticism)