सांगली : लग्न हा सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. हा आनंद द्विगुनीत करण्यासाठी वधू वरांची मोठ्या प्रमाणात हौस केली जाते. त्या हौसेला कोणतेही मोल नसते. आपले लग्न हटके व्हावे यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. यामध्ये महागड्या गाड्या, रथ, डोली, हेलिकॉप्टर यांचा प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार वापर करत असतात. अनेक लोक या सर्वांना फाटा देत जुन्या पद्धतीचे अनुकरण करू लागले आहे. मग हा ट्रेंड चांगला रुजू लागला आहे. सांगलीमधील विवाह समारंभात वधू-वरांनी जरा हटके विवाह केलाय.
कोण आहेत वध-वर
सांगली शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील उच्च शिक्षित असणाऱ्या अक्षता चव्हाण आणि प्रशांत पाटील यांचा विवाह थाटामाटात झाला. अक्षता ही एम.बी.ए असून पुणे येथे आयटी कंपनीत नोकरीस आहे. तिचे वडील अशोक चव्हाण हे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. प्रशांत यांचे मुंबई येथे महा ई सेवा केंद्र असून त्याचे वडील आनंदा पाटील हे शेतकरी आहे.
बैलगाडीतून आले वधूवर
वधूवर हे उच्च शिक्षित असताना ही अक्षताने ग्रामदेवतांचे दर्शन बैलगाडीतून जाऊन घेतले. त्यानंतर वधूवर वऱ्हाडी मंडळीसह लग्नस्थळी बैलगाड्यातून रवाना झाले. यासाठी वाद्य म्हणून पारंपारिक असणाऱ्या लेझीमचा वापर करण्यात आला. त्यामुळे लेझीम आणि बैलगाडीची एन्ट्री हेच सर्वांचे आकर्षण ठरले.
आठवले ते दिवस, जुनं ते सोनं
महागड्या गाड्यांऐवजी वरात बैलगाडीतून निघाली. मग गावातील अबाल वृद्धांना ते जुने दिवस आठवले. ज्यावेळी गाड्या नव्हत्या, त्यावेळी बैलगाडीतून वराती जात होत्या. आता पुन्हा जुने ते सोने म्हणत बैलगाडीचा फंडा ग्रामीण भागात रुजू लागला आहे. शहरी लोकांसाठी बैल गाडीतून नववधूची एन्ट्री आकर्षण ठरू लागली आहे.
जर हटकेची चर्चा
हौसेला मोलं नसतं असं म्हणतात, मग त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते. त्यात लग्न ( Wedding ) सोहळा म्हंटलं की विचारायचे कामच नाही. काही ठिकाणी लग्नात रूढी परंपरा असतात. त्यानुसार विधी केला जातो. परंतु काही हटके केले तर विवाह सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरतो. तसाच अक्षता चव्हाण आणि प्रशांत पाटील यांचा विवाह झाला.