कोल्हापूर: माता -भगिनींनो, उशिरा अनुदानाबद्दल सरकारच्यावतीने माफी मागतो, हे शब्द राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आहेत. कागलमध्ये दारिद्र्य रेषेखालील 21 कुटुंबाना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य अनुदानाचे वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी या भावना व्यक्त केल्या. कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील 21 कुटुंबाना हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मदत सुपूर्द करण्यात आली. ( Hasan Mushrif distribute amount of govt scheme to BPL Ration card holders family member at kagal)
गेल्या वर्षभरात दारिद्र्यरेषेखालील 21 कुटुंबातील कर्त्या कुटुंब प्रमुखांचे मृत्यू झाले. त्या कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून मिळणारं अनुदान त्या कुटुंबाना देण्यास उशीर झाल्यानं माता-भगिनींनो, मी राज्य सरकारच्यावतीने माफी मागतो, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
माता -भगिनींनो, उशिरा अनुदानाबद्दल सरकारच्यावतीने माफी मागतो!
कागलमध्ये दारिद्र्य रेषेखालील २१ कुटुंबाना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य अनुदानाचे वाटप…… pic.twitter.com/AwgpEcxrHH— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) April 9, 2021
21 कुटुंबांना अर्थसहाय्य
कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील 21 कुटुंबाना अर्थसहाय्याचे वाटप झाले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळतो. प्रापंचिक घडीच विस्कटते. म्हणून मी विशेष सहाय खात्याचा मंत्री असताना अशा कुटुंबाला वीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
गेल्या वर्षभरात तालुक्यातील 21 कुटुंबावर आघात होऊनही कोरोनामुळे हे अनुदान मिळाले नव्हते. कारण, कोरोना महामारीमुळे राज्याला एक लाख 53 हजार कोटींची तूट आली आहे. त्यामुळे, काही योजना मागे ठेवाव्या लागल्या होत्या. परंतु, सततच्या पाठपुराव्यामुळे मदत देता आली, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना नेमकी काय?
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना किंवा राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना दारिद्रय रेषेखालील कुटंबासांठी राबवली जाते. दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियाना एकर रकमी 20 हजार रुपयांचं अर्थसहाय्य केलं जातं. हा अर्ज जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यलायात, तलाठी कार्यालयात दाखल करता येतो. किंवा सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरुन भरता येतो.
संबंधित बातम्या:
( Hasan Mushrif distribute amount of govt scheme to BPL Ration card holders family member at kagal)