पुणे- मुंबईत डोंबिवलीमध्ये आढळलेल्या पहिल्या ओमीक्रॉन रुग्णानंतर पुण्यातील रुग्णांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र झांबिया देशातून 20 दिवसांपूर्वी पुण्यात आलेला व कोविड पॉझिटिव्ह असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा ओमायक्रॉन अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही लक्षणे आढळली
संबधीत व्यक्तीची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची 30 नोव्हेंबरला ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ म्हणजे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचं ठरवत त्यासाठी त्याचा स्वॅब राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. त्यात तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मात्र या व्यक्तीला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. प्रवास करून आल्यापासून या व्यक्तीला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता, तसेच तयाला हलका तापही आला होता.
जिल्हा प्रशासनाने बनवली यादी
ओमीक्रॉनच्या धास्तीमुळं प्रशासन सर्तक झाले आहे. प्रशासनाने आतापर्यंत परदेशातून पुणे व जिल्ह्यात आलेल्या 598 प्रवाश्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहरात393, पिंपरी -चिंचवडमध्ये 131, ग्रामीण भागात 67, खडकी कटक मंडळात 6 तर पुणे कटक मंडळात 1 अशा एकूण 598 प्रवाश्यांची यादी पुणे जिल्हा प्रशासनाचे तयार केली आहे. यातही ग्रामीण भागात आलेल्या लोकांपैकी हवेली तालुक्यात सर्वाधित 29 नागरिक परदेशातून आले आहेत, त्यानंतर मुळशीत 11 ,तर बारामतीत , इंदापूर, जुन्नरमध्ये प्रत्येक तीन नागरिकांचा समावेश आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांच्या केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार आरटीपीसार चाचणी होणार आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
Corona Update : एक डिसेंबरपासून ते आतापर्यंत विदेशातून महाराष्ट्रात आलेल्या आठ जणांना कोरोना
Nagpur fines भीती ओमिक्रॉनची, तरीही विनामास्क वावर, 42 हजार 67 जणांकडून दंड वसूल