Rain Update | पुण्यात पावसामुळे दाणादाण, सखल भागात पाणी साचलं, आगामी 4 दिवसांत राज्यात मुसळधार

| Updated on: Oct 09, 2021 | 8:57 PM

मुसळधार पावासाने पुणे शहराला पुन्हा एकदा झोपडून काढले आहे. पुण्याच्या पूर्व भागात 2 तासांपेक्षा जास्त वेळ पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे चाकरमानी तसेच नागरिकांची मोठी फजिती झाली.

Rain Update | पुण्यात पावसामुळे दाणादाण, सखल भागात पाणी साचलं, आगामी 4 दिवसांत राज्यात मुसळधार
PUNE RAIN
Follow us on

पुणे : मुसळधार पावासाने पुणे शहराला पुन्हा एकदा झोपडून काढले आहे. पुण्याच्या पूर्व भागात 2 तासांपेक्षा जास्त वेळ पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे चाकरमानी तसेच नागरिकांची मोठी फजिती झाली. धानोरीत येथे सखल भागात पाणी साचले तर वाकडेवाडी, ताडीवाला रोड येथे वृक्ष उन्मळून पडल्ची घटना घडली.

धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी

पुण्यात चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे रस्ते, नाले तुडूंब भरले होते. आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पवासामुळे धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे येथे इमारतीच्या पार्किंपर्यंत पाणी आले. ढगांच्या गडगडाटासह आज पुण्यात पाऊस बरसला.

ठिकठिकाणी पाणी साचले, चार ठिकाणी झाडे उम्नळून पडली

पुणे शहरात पावसामुळे बरसल्यामुळे येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, म.हौ. बोर्ड येथे पाणी साचले. तर वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, येरवडा येथे वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच पिसोळी ग्रामपंचायतजवळ वीज पडून आग लागल्याचा प्रकार समोर आला. घटनास्थळी घराबाहेरील मीटर बॉक्सने पेट घेतला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने दाखल होत आग विझवली. घराशेजारील इलेक्ट्रिक पोलवर वीज कोसळून पुढे लगेचच मीटर बॉक्सने पेट घेतला.

नालासोपाऱ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

पुण्यासोबतच महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. वसई विरार नालासोपाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या भागात संध्याकाळी आकाश पूर्णपणे भरून आले होते. त्यानंतर विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. तसेच राज्यात पुढचे 3 ते 4 दिवसात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह  मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी! एनसीबीनं ड्रग्जकांडात सोडलेल्यांमध्ये एकजण राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळचा, फडणवीसांचा गौप्यस्फोट

हातावर ‘देवेंद्र’ नावाचा टॅटू, आता म्हणतात, अजित पवारांवरील कारवाईचा निषेध, नरेंद्र पाटलांच्या मनात काय?

आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया

(heavy rain in pune city waterlogging in many places tree collapse at four places)