पुणे : राज्यात उशिराने आलेला मान्सून आता स्थिरावला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पाऊस सुरु आहे. या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे. मुंबई अन् पुणे शहरामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. आधी बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला रोखून धरले होते. परंतु वादळ शांत होताच आता मान्सूनने चांगलाच वेग पकडला आहे. पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट दिले आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून कसा असणार? याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा प्रभाव असणार आहे. काही भागांत मुसळधार ते काही ठिकाणी अतीमुसळधार पाऊस पडणार आहे. यासंदर्भात काही भागांत ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
येत्या 5 दिवसात राज्यात ? मुसळधार ते ?? अती मुसळधार पावसाची शक्यता असून;
? 2 जुलै पासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता, त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागांत व संलग्न भागावर होण्याची शक्यता. राज्यातही 4,5 दिवशी ते याचा प्रभाव असेल. https://t.co/xBKNQdPUls— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 30, 2023
मुंबईत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसानंतर अंधेरी भुयारी मार्ग पुन्हा एकदा काही काळासाठी बंद करण्यात आला. अंधेरी परिसरात सध्या पाऊस कमी झाला आहे. भुयारी मार्गातील पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुसळधार पावसानंतर अंधेरी एसव्ही रोडवरही पाणी साचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात यंदा मान्सून २५ जून रोजी दाखल झाला. दरवर्षी ७ जून रोजी दाखल होणारा मान्सून उशिराने आला. आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार सुरु आहे. यामुळे भाजीपाला निघत नाही. आवक कमी अन् मागणी जास्त झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. कधी शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकावा लागणारा टोमॅटो आता चांगलाच महाग झाला आहे. किरकोळ विक्री दर अनेक ठिकाणी 120 रुपये किलोवर गेला आहे.
पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पात 36 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील धरणांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा पाणी प्रकल्पाने गाठली मृत साठ्याची पातळी गाठली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात 43 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पाणी प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे.