पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहराच्या भोवती रिंगरोड पश्चिम रिंगरोड 37 गावांपैकी 36 गावांच्या भू संपादनाची अधिसूचना राज्यसरकारने जाहीर केली आहे. या 36 गावातील सर्व्हेनं अथवा गट नंबरवरून शेतकऱ्यांच्या नेमक्या किती जमीनीचे अधी-संपादन होणार हे कळणार आहे.
या तालुक्यांचा समावेश
जिल्ह्यातील पश्चिम भागातील ३६ गावातून हा रिंग रॉड जाणार आहे. यामध्ये भोर 92.90 हेक्टर , मावळ117.13 हेक्टर , मुळशी 217.30 हेक्टर अशी एकूण629.87 हेक्टर जमिनी अधिग्रहित होंबार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक पुलकुंडवार व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. चे संपादन केलं जाणार आहे. भोर हवेली, मुळशी या तालुक्यातून 68.80 किमीचा रिंगरोड जाणार आहे. त्यासाठी 754.82 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
प्रस्थावित खर्च
प्रस्थावित खर्च या रिंगरोडसाठी जमिनींचे संपादन करत असताना 1 हजार ४३९ कोटी इतका खर्च अपेक्षित धरला आहे. तर भूसंपादन व बांधकाम हा12हजार 175 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या रिंग रोडसाठी भोर, मुळाशी, मावळ, हवेली या चार तालुक्यातील 37 गावांपैकी 36 गावांचा समावेश आहे. रिंग रोड साठी भू संपादनाची सर्व मोजणी पूर्ण झाल्यावर व सर्व आक्षेपांवर उत्तरे दिल्यानंतर एका वर्षांच्या आत कलम 18 अन्वये भूसंपादन अधिकाऱ्यांनी राज्यशासनाकडे अहवाल देणे अपेक्षित होते. अधिकाऱ्याकडून अहवाल मिळाल्यानंतर संपादनाचे घोषणा पात्र तयार करण्यात येते.
IPL 2022 च्या मेगा ऑक्शन संदर्भात येऊ शकते एक वाईट बातमी
Nanded Crime: नांदेडमध्ये स्वस्त धान्य दुकानाची चौकशी चालू असतानाच तक्रारदाराची हत्या