पुणे – ‘ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही, मी आलोय पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Pune Municipal Corporation)तुमच्या मताची भीक मागायला’. असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी पुण्यात बोलताना केलं आहे . पुणे महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतस यात राजकारण (politics) तापताना दिसत आहे. प्रत्येक पक्ष हे कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांच हे विधान चर्चेत आल आहे. पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे, आणि अस असताना प्रगती कशी होणार असा सवाल करत पुण्यामध्ये दोन महानगरपालिका व्हायला पाहिजे अशी मागणी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे .
महानगरपालिकेत गावे समाविष्ट करण्याला माझा विरोधच, याने गावाच गावपण नष्ट होत.मात्र अजित पवारांना वाटत म्हणून ते निर्णय घेतात अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे.
पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सध्या चंद्रकांत पाटील यांनी दौरे सुरू केले आहेत. त्यातच काल शेवाळेवाडी येथे आयोजित सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी मी तुमच्याकडे पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि तुमची मतं बुक करायला आलेलो आहे. अस सांगतच गेल्या पाच वर्षात पुणे महानगरपालिकेमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये किंवा तो सिद्धही झालेला नाही असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे आगामी काळातही पुणे महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता येणार असून तुम्ही आम्हाला साथ द्या असं आवाहन त्यांनी केल आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे गावाचं गावपण नष्ट होतं आणि शहरात आलेला नागरिकांचा विकासही होत नाही,मात्र अजित पवारांना वाटत आपली महापालिका मोठी व्हावी कारण नंतर गावातील जमिनी हडप करयला मिळतात अशी टीका ही त्यांनी अजित पवारांवर केली आहे.
Russia America : यूक्रेनच्या युद्धानं अमेरिकेंचं महासत्तापद संपवलं, आता रशिया हाच जगाचा दादा?
24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पाकिस्तानात दाखल! इतकी वर्ष का नव्हता गेला? जाणून घ्या
Vastu Tips | मनी प्लांट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा