प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या कारनामे गाजत असताना तिच्या आईने धक्कादायक प्रकार केला आहे. पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते. त्यासंदर्भातील चित्रिकरण करण्यासाठी माध्यमे पोहचली. परंतु आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या. मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला. मनोरमा खेडकर माध्यमांच्या कॅमेऱ्यांना चित्रीकरणास विरोध करत होत्या. त्यामुळे मुलगी तर मुलगी परंतु तिच्या आईने कळस गाळला.
पूजा खेडकर यांच्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती. तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी 21 हजार रुपयांचा दंड केला. पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहचले. त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेल्या. कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर त्यांची पुण्यातून बदली झाली. या बदलीनंतर त्यांना वाशिममध्ये रुजू होण्याचे आदेश दिले होते. अखेर गुरुवारी त्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्या. त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांना विचारले. मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. आपण आज रुजू झालो आहोत, वाशिममध्ये आल्याचा आनंद आहे. पुढील वर्षभर कार्यरत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचा गृहजिल्हा सर्वात शेवटी मिळतो. परंतु पूजा खेडकर यांना सुरवातीलाच पुणे जिल्हा कसा मिळाला? हा एक मोठा गौडबंगाल आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी विरोधात याचिका दाखल केली होती. त्या सहा वेळा वैद्यकीय चाचणीत गैरहजर होत्या. त्यानंतर त्यांना कसे घेतले, हा एक प्रश्न आहे.
IAS पूजा खेडकर वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख, तरीही नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र