Sachin Ahir | आघाडीत बिघाडी कराल तर यादा राखा, सचिन अहिरांनी कोणाला भरला दम?

| Updated on: Feb 19, 2022 | 10:52 AM

हे महाविकास आघाडीचंयं, आघाडीत जर कोणी बिघाडी करत असेलं तर याद राखा राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेयत असं विधान सचिन अहिर यांनी केलंय.

Sachin Ahir | आघाडीत बिघाडी कराल तर यादा राखा, सचिन अहिरांनी कोणाला भरला दम?
Sachin-Ahir
Follow us on

विनय जगताप , पुणे–  जिल्हापरिषद आणि पंचायत समिती (Panchayat Samiti)निवडणुकीच्या (Election)पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. वेल्हा तालुक्यात शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी सरकार आघाडीचं असलं तरी स्थानिक पातळीवर होतं असलेल्या बिघाडीवरं त्यांनी भाष्य केलंय. कार्यक्रमा दरम्यान बोलताना, तालुक्यात आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या भूमिपूजन आणि उदघाट्नच्या वेळी पोस्टरवर उद्धव ठाकरेंच नावं आणि फोटो येत नसल्याने नाराजी व्यक्त केलीय. यावर बोलताना सरकार हे महाविकास आघाडीचंयं, आघाडीत जर कोणी बिघाडी करत असेलं तर याद राखा राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेयत असं विधान सचिन अहिर यांनी केलंय.

मोर्चे बांधणीस सुरुवात

पुणे जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झालीय. भोर -वेल्हा -मुळशी तालुक्यातही सर्व पक्षाचे नेते आपआपल्या परीनं उदघाट्न, भूमिपूजन, गावभेटी, कार्यकर्ता मेळावे,स्थानिक नेत्यांचे पक्ष प्रवेश अशा कार्यक्रमाचं आयोजन करतायत. कार्यक्रमा दरम्यान वेल्हे तालुका शिवसेनेच्या वतीने कार्यकारी निवडीचे पत्रवाटप, पक्षप्रवेश तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रात राज्य पातळीवर नावीन्यपूर्ण कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये होतायत वाद

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्याच्या मात्र अद्यापही हे पचनी पडलेलं नाही. छोट्या कार्यक्रमातून सातत्यातून याचा प्रयत्यय येत असतो. अनेकदा विकास कामाच्या श्रेयवादावरूनही अनेकदा कार्यकर्ते हमरातुमरीवर येताना दिसतात . जिल्ह्यात शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वादही अनेकदा या चव्हाटयावर आलेला आहे. बैलगाडा शर्यतींवरूनही चांगलाच वाद रंगला होता.

एक हात मदतीचा, दर्शन घडवुया माणुसकीचा!, गोंदियातील तीन हजार विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप

Shiv Jayanti 2022 | कोरोना नियमांच पालन करुन शिवजयंती साजरी करुया : संभाजी छत्रपती

जय भवानी ,जय शिवाजीच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार, अलंकारांची पूजा