पुणे – उद्यापासून घर खरेदीसाठी पुण्यात मेट्रोचा (Pune Metro) अधिभार लागू होणार आहे. हे सगळं होत असताना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 2022-23 या वर्षासाठी पुण्यात रेडी रेकनर(Ready Reckoner) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुद्रांक शुल्क विभागाने घेतले शासना पुणे व पिंपरी-चिंचवड (Pune and Pimpri-Chinchwad)शहरांत सरासरी 6, तर ग्रामीण भागात 10 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. तर नगरपालिका क्षेत्रात 5 टक्के वाढ सुचविली आहे. केवळ शासनाच्या मान्यतेनंतर दर रेडीरेकनर वाढीवर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांतून रेडीरेकनरचे प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक विभागाकडे प्राप्त झाले आहेत.
सरसकट वाढ नाही
यंदा पुण्यात रेडी रेकनरच्या दरात सरसकट वाढ न करता. काही भागातील दर हे कमी केले जाणार आहेत. यामुळे घराची खरेदी करणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यात दरवर्षी 1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जातात. या दरानुसार जमीन, सदनिका, आणि दुकाने आदी मालमत्तांचे दर ठरतात. मागील काही वर्षे अपवाद वगळता रेडी रेकनरच्या दरात दरवर्षी वाढ झाली आहे.
पहिल्यांदाच कमी होणार दर
2018 मध्ये करण्यात आली मुद्रांक कायद्यात सुधारणामुळे शहरातील काही भागांतील घरांचे दर होणार कमी होणार आहेत. या सुधारणेनुसार ज्या भागात प्रत्यक्ष रेडी रेकनरचे दर आणि खरेदी-विक्रीचे दर यामध्ये तफावत आहे, या परिसरातील रेडी रेकनरचे दर पहिल्यांदाच कमी करण्यात येणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यात दरवर्षी 1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जातात. या दरानुसार जमीन, सदनिका, आणि दुकाने आदी मालमत्तांचे दर ठरतात. पुण्यात होता असलेल्या विकास प्रकल्पांमुळे शहरातील काही भागातील दरांमध्ये वाढ झाले आहे.
Gudi Padawa 2022 | गुढीपाडव्याचे धर्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या गुढी कशी उभारावी
Sugarcane: अगोदर अतिरिक्त ऊसाचा अहवाल मग तोडणीचे नियोजन, नगदी पिकातून शेतकऱ्याचे नुकसान
MS Dhoni : एमएस धोनीचे आदर्श कोण?, धोनी कुणाला प्रेरणास्थान मानतो, वाचा धोनीविषयी काही खास गोष्टी