Pune crime |पुण्यात मोह माया महागात, कॉल गर्लनं गंडवलं, व्यापाऱ्याचे 60 लाख उडाले

| Updated on: Feb 12, 2022 | 4:29 PM

श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीजसोबत मिटिंग करुन देण्यासाठी सिक्युरिटी फी भरावी लागेल, अशी माहिती देण्यात आली. त्यासाठी सुरुवातीला 2 लाख रुपये ट्रान्सफर (Transfer)करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून एकूण 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली.

Pune crime |पुण्यात मोह माया महागात, कॉल गर्लनं गंडवलं, व्यापाऱ्याचे 60 लाख उडाले
पेगासस हेरगिरी प्रकरण : समितीचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर
Follow us on

पुणे – शहरात गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक घटना पुण्यात (Pune) उघडकीस आली आहे. हाय  प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील असे सांगत तरुणीनं 76 वर्षाच्या व्यावसायिकाची 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी (cyber police) एका महिलेला अटक केली आहे. दिपाली कैलास शिंदे (वय 26 , रा़ नेताजीनगर, वानवडी) असे या महिलेचे नाव आहे. हा गुन्हा मे 2021 पासून फेब्रुवारी 2022 या कालावधीत घडला आहे  श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीजसोबत मिटिंग करुन देण्यासाठी सिक्युरिटी फी भरावी लागेल, अशी माहिती देण्यात आली. त्यासाठी सुरुवातीला 2 लाख रुपये ट्रान्सफर (Transfer)करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून एकूण 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली.

तर झालं असं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांनी मिनाक्षी फ्रेंडशिप क्लब नावाची जाहिरात पाहून संपर्क केला. त्यात त्यांना क्लब हा श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीज सोबत सेक्स करण्यासंदर्भात असून त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यात आला. फिर्यादी यांची सायबर पोलिसांकडे त्याची तक्रार मिळाल्यावर आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बँक अकाऊंटची माहिती व इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये आरोपी ही वानवडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिचा शोध घेऊन शिंदे हिला अटक करण्यात आली आहे.

उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविणार

शिंदे ही उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविणार असे लोकांना फोनद्वारे सांगण्याचे काम करीत होती व गुन्ह्यामधील रक्कम घेण्यासाठी स्वत:चे बँक अकाऊंटचा वापर केला आहे. शिंदे हिच्या मार्फत हा सवे कट कारस्थान करणार्‍या मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी़. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगिता माळी, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस अंमलदार राहुल हंडाळ, अंकिता राघो, शुभांगी मालुसरे व निलेश लांडगे यांनी ही कारवाई केली.

Charu Sharma, IPL Auction 2022: विराटला विकत घेणारा आता संभाळणार लिलावाची जबाबदारी

Nagpur Crime | ससेगावात गावठी बॉम्बचा स्फोट, तीन जणांच्या डोळ्यात गेली माती, काय आहे प्रकरण? 

चटकदार लोणचं बनवता येतं? मग आकर्षक बक्षीसाची संधी, औरंगाबादची आगळी वेगळी स्पर्धा, कुठे करणार नोंदणी?