पुणे – राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचा समावेश करावा. या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या बेमुदत संपाला विविध राजकीय संघटनांनी पाठींबा दिला आहे. त्याच्याबरोबर आता कर्मचाऱ्यांच्या या संपाला पाठींबा देण्याचा निर्णय पुणे बस असोसिएशनने घेतला आहे. सरकारकडून सहकार्य मिळत नसल्यानं खासगी बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात प्रवाश्यांनी भरलेल्या बसेस रिकाम्या केल्या. कोल्हापूरमध्ये खासगी बसेसच्या काचा फोडून वाहकाला मारहाण करण्यात आली. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. जर अशा पद्धतीने खाजगी बस नुकसान होत असल्यानं आम्ही बस थांबवण्याचा निर्णय घेऊन संपाला पाठिंबा दिला असल्याची माहिती बस संघटनेचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली आहे. तसेच आज दुपारी परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल अशी माहिती पुणे बस असोशिएशनने दिली आहे.
हा लढा असाच सुरु ठेवणार
दुसरीकडं पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होता नाही तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार आजही सलग चौथ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना महामंडळ प्रशासनानं गेटच्या बाहेर काढलं आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वारगेट बस स्थानकांच्या गेट बाहेर बसून आपले आंदोलन सुरु ठेवसं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत, हा लढा असाच सुरु ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आमची खूप साधी मागणी असून आमचा राज्य शासनामध्ये समावेश करावा ही मागणी सातत्यानं कर्मचाऱ्यांकडून केली हा जात आहे.
पुण्यातील 26 कर्मचारी निलंबित
राज्यातील 120बस डेपोतील कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. राज्यभर सुरु असलेल्या या आंदोलनाचा एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फाटक बसत आहे.त्यामुळं सर्वसाधारणपणे महामंडळाचं सर्वसाधारणपणे दररोज एक कोटीचे आर्थिक नुकसान होत आहे. राज्यातील विविध बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण918 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामध्ये पुणे डेपोतील26 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
एस.टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी व मनसेचा पाठींबा
नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पार्थ पवारांचे ‘सूचक’ ट्वीट