सागर सुरवसे, सोलापूर, दि.19 जानेवारी 2024 | सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा हा गृह प्रकल्प आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून रे नगर फेडरेशनने हा प्रकल्प उभारला आहे. 30 हजार घरांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये 834 इमारती आहेत. 1 BHK चे 30 हजार फ्लॅट आहेत. 365 एकर मैदानात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातील 30 हजारांपैकी 15 हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे या घरांची मालकी महिलांच्या नावाने असणार आहे. १५ हजार घरांच्या चाव्यांचे वितरण यावेळी होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
गृह प्रकल्पात क्रीडांगण, स्किल स्किल डेव्हलपमेंट सेंटर, योगा सेंटर तसेच 24 अंगणवाडी आणि 6 प्राथमिक शाळा उभारण्यात आल्या आहेत. 1 आरोग्य केंद्र, विजेचे उपकेंद्र उभारले आहे. त्यात 24 तास पाणी आणि वीज असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 30 हजार घरांपैकी 15 हजार घरांचा चावी वाटप करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेसाठी 5 लाख स्क्वेअर फुटाचा मंडप उभारला आहे. 1 लाख कामगारांची सभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून रे नगर येथील गृह प्रकल्प कार्यक्रमाचा पूर्वतयारीचा आढावा घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रे नगर येथील मॉडेल घराची पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या हस्ते रेनगर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे.
पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. रे नगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसिया अडम यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबरोबर सोलापुरातून रोड शो करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.