रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेससंदर्भात महत्त्वाची अपडेट

| Updated on: Nov 26, 2021 | 8:15 AM

कोरोना विषाणू संसर्ग (Corona Outbreak) झाल्यानंतर ही लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ही नियमित सेवा स्थगित केली होती. या दरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येत होत्या.

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेससंदर्भात महत्त्वाची अपडेट
railway
Follow us on

पुणे: मुंबई- पुणे (Mumbai-Pune) असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे-मुंबई मार्गावरील इंटरसिटी (Mumbai Pune Intercity) आणि मुंबई-चेन्नई (Mumbai Chennai) दरम्यानची रेल्वे सेवा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग (Corona Outbreak) झाल्यानंतर ही लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ही नियमित सेवा स्थगित केली होती. या दरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येत होत्या. आता पुणे मुंबई मार्गावरील इंटरसिटी एक्स्प्रेस सुरु होत असल्यानं प्रवाशांना दिलासा भेटणार आहे.

गाडी सुटण्याची वेळ काय?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पुणे इंटरसिटी दैनंदिन रेल्वे सकाळी 6.40 वाजता सुटणार असून, पुणे येथे सकाळी 9.57 वाजता पोहोचेल. तर, पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी दैनंदिन रेल्वे सायंकाळी 5.55 वाजता सुटेल आणि ती मुंबई येथे 9.05 वाजता पोहोचणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. दादर, ठाणे, लोणावळा आणि शिवाजीनगर या ठिकाणी रेल्वे थांबणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

मुंबई चेन्नई सुपरफास्ट रेल्वे देखील सुरु होणार

मुंबई-चेन्नई दरम्यानची रेल्वेगाडी देखील 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मुंबई- पुणे मार्गे धावणारी चेन्नई अतिजलद त्रि साप्ताहिक एक्स्प्रेसही 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यामुळं महाराष्ट्र ते तामिळनाडू प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

युनिव्हर्सल पास आणि युटीएस मोबाईल अ‍ॅपची लिंकिंग

रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने युटीएस मोबाईल अ‍ॅप आणि युनिव्हर्सल पास लिंक करण्यात आले आहेत, अशी माहिती अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दिली. यूटीएस मोबाईल अ‍ॅप आणि युनिव्हर्सल पास लिंकिंगमुळे प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय त्यांचे तिकीट विनाव्यत्यय मिळू शकेल. प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस मिळालेले असतील आणि शेवटच्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी झाला असेल अशांना राज्य सरकारच्या पोर्टलद्वारे लसीकरण स्थितीची योग्य पडताळणी केल्यानंतर जारी करण्यात आलेला राज्य सरकारचा युनिव्हर्सल पास घ्यावा लागेल. तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काऊंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागतो. युनिव्हर्सल पास जारी करणारे राज्य सरकारचे पोर्टल रेल्वेच्या यूटीएस मोबाइल ॲपशी जोडले गेले आहे ज्यामध्ये वर नमूद केलेल्या श्रेणीतील प्रवासी काऊंटरवर न जाता तिकीट खरेदी करू शकतील.

या ॲपद्वारे प्रवासी तिकीट आणि मासिक तिकीट दोन्ही जारी केले जाऊ शकतात. मासिक तिकिटांचे नूतनीकरण देखील शक्य आहे. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना काउंटरवर जाण्याची गरज नाही. ही सुविधा 24 नोव्हेंबरपासून अँड्रॉइड गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध होईल.

इतर बातम्या:

Corona New Variant : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरिएंट, भारत सरकार सतर्क, राज्यांना महत्त्वाचे आदेश

म्यानमार-भारत सीमा भागात भूकंपाचे धक्के; 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

Indian Railway Restore Mumbai Pune Intercity express service from 1 December