इंद्रायणी नदीत रसायन युक्त पाणी सोडले, सहा कंपन्यांवर केली मोठी कारवाई

| Updated on: Jan 29, 2023 | 11:01 AM

इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या नाल्यांमधून रंगीत पाणी येत होते. त्यासंदर्भातील तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर मनपाच्या पथकाने पाहणी केली. त्यात सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्‍यांतील सांडपाणी नदीत सोडल्याचे आढळून आहे.

इंद्रायणी नदीत रसायन युक्त पाणी सोडले, सहा कंपन्यांवर केली मोठी कारवाई
इंद्रायणी नदी प्रदूषण
Follow us on

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेने (pimpri chinchwad corporation) सहा कंपन्यांना मोठा दणका दिला आहे. इंद्रायणी नदीत रसायनयुक्त सांडपाणी (Chmical Water) सोडले. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीचा (Indrayani river) प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत होता. टीव्ही ९ यासंदर्भात वारंवार वृत्त दिले होते. अखेरी मनपाने सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या जलनिःसारण विभागातर्फे तक्रार देण्यात आली होती.

तळवडेपासून डुडुळगावपर्यंत आणि आळंदी हद्दीपासून चऱ्होलीपर्यंत इंद्रायणी नदीची हद्द आहे. चिखलीपासून मोशीपर्यंत नदीच्या परिसरात अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या पर्यावरण विभागाचे कोणतेही नियम पाळत नाही. भोसरी ‘MIDC’तील बहुतांश कंपन्यांचे सांडपाणी नदीत सोडले जात होते.

त्याचा परिणाम नदी प्रदूषित होत होती. अनेक सामाजिक संघटना  इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने मांडत होते. त्यानंतर महानगरापालिकेने पाहणी केली असता अनेक कंपन्या व लघुउद्योजकांनी कंपन्यांमधील सांडपाणी नदीत सोडल्याचे दिसून आले. या कंपन्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

कसा उघड झाला प्रकार

इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या नाल्यांमधून रंगीत पाणी येत होते. त्यासंदर्भातील तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर जलनिःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन व कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांनी पाहणी केली. त्यात सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्‍यांतील सांडपाणी नदीत सोडल्याचे आढळून आहे.

काय झाले होते

इंद्रायणी नदीवर बर्फाची चादर दिसत होती. एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे बर्फाची चादर दिसते तशीच अवस्था इंद्रायणी नदीची झाली होती. नदी पात्रात अनेक ठिकाणी फेसच-फेस दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था झाली होती.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आळंदीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यांपूर्वी आले होते. त्यावेळी महेश महाराज मडके यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा मांडला होता. तेव्हा मुख्यमंत्री यांनी नदी स्वच्छतेचे आश्वासन दिले होते.