पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्तीबरोबच दिमाखदार आयोजन चर्चेचा विषय ठरलं. महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) निमित्तानं भाजपनं (BJP) आगामी निवडणुकीची तयार केल्याचं बोललं जातंय. आगामी काळात भाजपचा चेहरा कोण असेल, हा मुद्दा चर्चेत राहिला. शक्तीच्या खेळाबरोबरचं श्रद्धा आणि भक्तीचं दर्शन महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिसला. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना दिमाखदार पद्धतीनं साजरा झाला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही अतिशय सुंदर आयोजन केलं. इथं येईपर्यंत हे आयोजन इतकं भव्य असेल, असं वाटलं नव्हतं. तसं रोज टिव्हीवर बघत होतो. पण, टीव्हीवर या आयोजनाची भव्यता दिसत नव्हती. चारही बाजूला लोकं येथे आहेत.
कुस्ती आयोजनाच्या चेहऱ्यांपैकी एक चेहरा हा पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ होते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं भाजप पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना पुढं आणू पाहत असल्याची माहिती आहे.
नागपुरात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं निवडणुका लढविल्या जातात. नाशिकसाठी गिरीश महाराज यांचा चेहरा भाजप पुढं करते. तर मुंबईत आशिष शेलार यांचा चेहरा पुढं केला जातोय. तसाच पुण्यात अद्याप भाजपचा प्रमुख चेहरा नाही.
पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही राज्यातल्या मोठ्या महापालिका आहेत. दोन्ही शहरात भाजपचा प्रमुख चेहरा नाही. त्यामुळं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त भाजपनं पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा चेहरा पुढं केल्याचं बोललं जातंय.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ४० लाख रुपये मिळत होते. देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. खेळाडूंच्या राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था करणार आहोत.
जास्त निधीची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लगेच गिरीश महाराज यांना फोन केला नि सांगितलं की, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला एक कोटी रुपये द्यायचे. त्यामुळं ही स्पर्धा भव्य होऊ शकली.