पुणे : UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते.UPSC त यश मिळवण्याचे स्वप्न अनेक युवकांचे असते. परंतु अनेक प्रयत्न करूनही बहुतेक जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. या परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनतात. या परीक्षेत यशाचे एकच सूत्र आहे ते म्हणजे कठोर परिश्रम आणि परिश्रम. पुणे शहरात शिक्षण झालेला अन् जालनाचा अन्सार शेख हे त्याचे उदाहरण आहे. अन्सार वयाच्या २१व्या वर्षी आयएएस झाला. देशातील सर्वात तरुण आयएएस होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
काय आहे अन्सारची कौटुंबिक काहाणी
अन्सार अतिशय गरीब कुटुंबातील होता. त्याचे वडील ऑटोरिक्षा चालवत होते. त्याच्या घरात अभ्यासाचं वातावरण अजिबात नव्हतं. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबाने अन्सारचे शिक्षण थांबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याचे वडील शाळेत गेले आणि शिक्षकांना त्याचे नाव काढण्यास सांगितले. मात्र अन्सार अभ्यासात चांगला असल्याने शिक्षकाने त्याच्या वडिलांना समजून सांगितले. परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्याच्या भावाने १०वीमध्येच शिक्षण सोडून गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली होती. पण अन्सारने धीर धरला आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवले.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण
अन्सारने बारावीनंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली. त्यात त्याला ७३ टक्के गुण मिळाले. आपला खर्च चालवण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची कामेही केली. सलग तीन वर्षे दिवसाचे 12 तास काम करून UPSC परीक्षेची तयारीही केली. अन्सारची आर्थिक परिस्थिती आणि त्याच्यातील हुशारी पाहून त्याच्या कोचिंग सेंटरने त्याची फी माफ केली होती. अन्सारने केवळ एक वर्षच कोचिंग घेतले.
पहिल्याच प्रयत्नात युपीएससी
2015 मध्ये अन्सारने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली. अन्सार शेख वयाच्या २१ व्या वर्षी ३६१ रँक मिळवून देशातील सर्वात तरुण आयएएस बनला.
सोशल मीडियावर सक्रीय
अन्सार शेखने आयएएस झाल्यानंतर लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव वैजा आहे. अन्सार शेख आणि त्याची पत्नी सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. सामजिक विषयांवरील चर्चेत ते सहभागी होत असतात.
हे ही वाचा
पुण्यातील IAS ने दोन भेटीनंतरच केले टीव्ही कलाकाराशी लग्न, वाचा त्यांची लव्ह स्टोरी
पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या
पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा, पाहा वर्षभरात किती कोटींचा झाला दंड