सायेब… मी पण फोडू का नारळ?… जयंत पाटलांनी केली पूर्ण 6 वर्षीय लहानग्याची इच्छा

| Updated on: Sep 19, 2021 | 12:24 PM

सायेब... मी पण फोडू का नारळ?... फोडू नारळ... असा हट्ट एका 6 वर्षाच्या लहानग्या मुलाने धरला. लहानग्या संचितचे निरागस बोल ऐकून जयंतराव पाटलांनी लागलीच त्याची इच्छा पूर्ण केली. (Jayant Patil)

सायेब... मी पण फोडू का नारळ?... जयंत पाटलांनी केली पूर्ण 6 वर्षीय लहानग्याची इच्छा
jayant patil
Follow us on

सांगली: सायेब… मी पण फोडू का नारळ?… फोडू नारळ… असा हट्ट एका 6 वर्षाच्या लहानग्या मुलाने धरला. लहानग्या संचितचे निरागस बोल ऐकून जयंतराव पाटलांनी लागलीच त्याची इच्छा पूर्ण केली. संचितच्या हातात नारळ दिला आणि सांगितलं फोड नारळ. त्यामुळे संचितने नारळ फोडला आणि त्याची नारळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याची इच्छाही पूर्ण झाली. (jayant patil inagurated development works in sangli)

जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले. वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना 6 वर्षीय संचित गावडेही त्यावेळी तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून लहानग्या संचितलाही याचे मोठे कुतूहल वाटले. मोठी हिम्मत करुन करून संचितने नारळ फोडण्याची इच्छा मंत्री जयंतरावांकडे व्यक्त केली. जयंत पाटील यांनी या लहानग्याची इच्छा पूर्ण केली. बर्‍याचदा आपल्या कृतींच्या माध्यमातून राजकीय नेते लोकांची मने जिंकत असतात. आज राज्याचे पाटील यांनीही आपल्या अशाच एका कृतीच्या माध्यमातून वाळवाकरांची मने जिंकली.

टोल न भरता रस्त्याचा वापर

दरम्यान मंत्री जयंत पाटलांनी कालपासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसात तब्बल 41 कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ करत धडाका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज इस्लामपूर येथे तब्बल 23 कोटी इतक्या रकमेच्या विविध रस्ता सुधारणीच्या कार्यांचा शुभारंभ करण्यात आला. त्यात इस्लामपूर-वाघवाडी रस्ता चौपदरीकरण कॉंक्रिटीकरण करणे, इस्लामपूर-बहे रस्त्याच्या सुधारणेचा, हुबालवाडी-इस्लामपूर रस्त्याच्या सुधारणेचा समावेश होता. ही रस्त्याची कामे पूर्ण होताच नागरिकांना रहदारीसाठी मोठा दिलासा मिळेल. इस्लामपूर आणि परिसरातील नागरिकांना कोणताही टोल न देता या रस्त्यांचा वापर करता येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीस-पाटील एकत्र

दरम्यान, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर होते. विशेष म्हणजे दोघेही नेते एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती.

लगेच अंदाज बांधू नका

मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सीरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते धुळ्यात बोलत होते. (jayant patil inagurated development works in sangli)

 

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी! फडणवीस काय म्हणाले?

‘पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज’, मुनगंटीवारांचा जोरदार टोला

सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला सातत्याने बोलावं का लागतं? आशिष शेलारांचा राऊतांचा खोचक सवाल

(jayant patil inagurated development works in sangli)