पुणे : कोरोना (Corona) काळात लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांचा रोजगार हिरावला गेला. सर्व आर्थिक व्यवहार बंद असल्याने अनेकांवर आर्थिक संकटही ओढावलं होतं. पण आता अनलॉकमध्ये सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. अशात आता टपाल विभागाने (Postal Department) पुणे जिल्ह्यासाठी रोजगाराच्या संधी उलपब्ध करून दिल्या आहेत. टपाल जीवन विमा विभागात (Postal Life Insurance Department) एजंट (Agent) म्हणून या काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी थेट मुलाखती (Direct Interview) ठेवण्यात आल्या आहेत. (The postal department is recruiting for the post of insurance agent in Pune district)
टपाल विभागाकडून पुणे शहर आणि जिल्ह्यात टपाल विमा एजंट म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 7 सप्टेंबरला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत थेट मुलाखती घेण्यात येणार आहे.
टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा एजंट पदाच्या थेट मुलाखतीसाठी जंगली महाराज रस्ता इथं असलेल्या डाकघर अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग या कार्यालयात सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्डसह अन्य संबंधित कागदपत्र घेऊन उपस्थित रहायचं आहे.
टपाल विभागातल्या विमा एजंटसाठी 18 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंत कुणीही मुलाखत देऊ शकतं. बेरोजगार, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही जीवन विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल विमा एजंटसाठी पात्र आहेत.
थेट एजंट म्हणून नियुक्तीनंतर टपाल विभागाने निर्धारित केलेले कमिशन प्रोत्साहनपर भत्ता नियमितपणे देण्यात येईल. नियुक्त झालेल्या उमेदवारांना टपाल विभागातर्फे अंतरिक प्रशिक्षण दिलं जाईल.
संबंधित बातम्या :